भालगावात राम जन्मोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:38 IST2019-04-13T22:38:26+5:302019-04-13T22:38:42+5:30
भालगाव येथे शनिवारी रामजन्मोत्सवाची सांगता करण्यात आली.

भालगावात राम जन्मोत्सवाची सांगता
चितेपिपळगाव : येथून जवळच असलेल्या भालगाव येथे शनिवारी रामजन्मोत्सवाची सांगता करण्यात आली.
गुडी पाडव्यापासून येथे राम मदिरांत दररोज संध्याकाळी धार्मिक कार्यकमांचे आयोजन केले होते. शनिवारी दुपारी १२ वाजता राम जन्म सोहळा पार पडला. यावेळी कृउबा चे उपसभापती भागचंद ठोबरे, प्रकाश पवार डॉ भगवान नागरे, गोपीनाथ वाघ मुरलीधर आदी उपस्थित होते. तसेच बोरनदीच्या काठावर १२ गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी निपाणी आडगाव, एकोड, पाचोड , लायगाव, आपतगाव, चितेपिगांवातील भाविक उपस्थित होते. त्यानंतर यावेळी लायन्स क्लबतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले.