शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रॉमा केअर सेंटर’ डॉक्टरांअभावी बंद

By admin | Updated: July 11, 2016 00:28 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड बीड-परळी राज्यस्त्यावर तेलगाव येथील ट्रॉमा केअर सेटर सुरू करा असे आदेश सहा महिन्यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यादरम्यान दिले होते.

व्यंकटेश वैष्णव , बीडबीड-परळी राज्यस्त्यावर तेलगाव येथील ट्रॉमा केअर सेटर सुरू करा असे आदेश सहा महिन्यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यादरम्यान दिले होते. मात्र डॉक्टर व लागणारे साहित्य नसल्याचे कारण पुढे करत अद्यापही तेलगाव येथील ट्रॉमा केअर सेंटर बंद स्थितीत आहे. केवळ दोन परिचारीकांची त्याठिकाणी नियुक्ती केलेली आहे. परळी- बीड या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपघात होतात. अपघातांमध्ये जखमींना तात्काळ उत्तम आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने तेलगाव या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर साठी ईमारत उभारून दोन वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. परिणामी अपघातातील रुग्णांच्या जीवाशी आरोग्य प्रशासन खेळ करत आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या तुघलकी कारभारामुळे व पाठपुराव्या अभावी तेलगाव येथील सेंटरवर अद्याप पर्यंत थ्रीफेज वीज नाही. शिवाय अपघातात जखमी रुग्णांवर आॅपरेशन करताना आवश्यक असलेली सीआर मशीन देखील दोन वर्षात उपलब्ध झालेली नाही. तेलगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरळीत सुरू करा, अशा सूचना अनेकवेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या आहेत. असे असताना देखील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी केला आहे.मागील पाच वर्षांत बीड-परळी राज्यरस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या दृष्टीने राज्य आरोग्य विभागाने परळी व बीड या शहरांच्या मध्यभागी तेलगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू केले होते. परंतु अद्याप पर्यंत डॉक्टरांच्या जागा भरल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले.