मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांचा पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:59 IST2018-11-25T21:58:41+5:302018-11-25T21:59:03+5:30
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीने आवाहन करुनही मालमत्ता व पाणी कर न भरणाºया नागरिकांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय वाळूज ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यानुसार कर थकवलेल्या मालमत्ताधारकांवर कारवाई करत ३० नळ कनेक्शन कापून पाणीपुरवठा बंद केला आहे.

मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांचा पाणीपुरवठा बंद
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीने आवाहन करुनही मालमत्ता व पाणी कर न भरणाºया नागरिकांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय वाळूज ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यानुसार कर थकवलेल्या मालमत्ताधारकांवर कारवाई करत ३० नळ कनेक्शन कापून पाणीपुरवठा बंद केला आहे.
वाळूज ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी आहे. काही जणांनी तर वर्षानुवर्षे करच भरलेला नाही. विशेष म्हणजे यात अनेक प्रतिष्ठितांचाही समावेश आहे. ही मंडळी कर वसुलीला गेलेल्या कर्मचाºयाला दमबाजी करुन परतावून लावतात. काही मोजके च लोक नियमित कर भरत असल्याने ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळत नाही.
नागरिकांकडे कोट्यवधी रुपयांचा कर थकल्याने वाढत्या लोकसंख्येला पायाभूत सुविधा पुरविताना स्थानिक प्रशासनाची दमछाक होत आहे. मागील महिन्यात ग्रामपंचायतीने कर वसुली मोहीम राबविली होती. पण या मोहिमेला नागरिकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने कर थकविणा-यांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीने अनेकवेळा सांगूनही कर न भरणाºया मालमत्ताधारकांवर कारवाई करत ३० जणांचे नळ कनेक्शन कापले आहेत.
ग्रामपंचायतीच्या या आक्रमक कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात कर वसूल होणार आहे. दरम्यान ग्रामपंचायत व्यक्ती पाहून कारवाई करीत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे.
या विषयी सरपंच पपीन माने म्हणाले की, मालमत्ता व पाणीपट्टी पोटी नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकला आहे. सांगूनही लोक कर भरत नसल्याने विकास कामे करण्यास अडचणी येत आहेत. वसुली मोहीम राबवून कर न भरणाºयाचे नळ कनेक्शन कापले जात आहे. सोमवारी बड्या थकबाकीदारा विरुद्ध वसुली मोहिम राबविली जाणार आहे.