शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

औरंगाबादेत निदर्शने, घोषणाबाजी आणि रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:39 IST

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी विविध राजकीय पक्षांतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदचा शहरात फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र बंददरम्यान केलेल्या आंदोलनांनी शहरातील वातावरण ढवळून निघाले. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, महाराष्टÑ नवनिर्माण सेना, विविध डावे पक्ष, रिपाइं (डेमोक्रॅटिक) आदी राजकीय पक्षांनी शहरात ठिकठिकाणी तीव्र आंदोलन करून इंधन दरवाढीचा निषेध केला.

ठळक मुद्देजनतेचा प्रतिसाद कमी : सकाळी काही ठिकाणी दुकाने बंद; फारसा परिणाम आणि अनुचित प्रकार नाही; पेट्रोलपंप चालकांचा पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी विविध राजकीय पक्षांतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदचा शहरात फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र बंददरम्यान केलेल्या आंदोलनांनी शहरातील वातावरण ढवळून निघाले. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, महाराष्टÑ नवनिर्माण सेना, विविध डावे पक्ष, रिपाइं (डेमोक्रॅटिक) आदी राजकीय पक्षांनी शहरात ठिकठिकाणी तीव्र आंदोलन करून इंधन दरवाढीचा निषेध केला.सकाळी १० वाजेपासून शहरात सुरु झालेल्या बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दुपारी २ वाजेनंतर तर सर्व व्यवहार सुरळीत पार पडले. मुख्य रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम जाणवला. सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत बंद पाळून शहरातील सर्व पेट्रोलपंपांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.रास्ता रोकोसह काँग्रेसची निदर्शनेपेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ भारत बंददरम्यान आज आंदोलने तीव्र झाली होती. एकट्या काँग्रेसतर्फे शहराच्या विविध भागात अकरा ठिकाणी निदर्शने करण्यात आली.सिडकोतील एसबीईओ शाळेसमोरील पेट्रोलपंप, मुकुंदवाडी येथील पेट्रोलपंप, भवानी पेट्रोलपंप, राज पेट्रोलपंप, क्रांतीचौक पेट्रोलपंप, बाबा पेट्रोलपंप, रेल्वेस्टेशन पेट्रोलपंप, दिल्लीगेट पेट्रोलपंप, शाहगंज पेट्रोलपंप, कमलनयन बजाज हॉस्पिटलसमोरील पेट्रोलपंप व म्हस्के पेट्रोलपंप येथे निदर्शने करण्यात आली. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत हे पेट्रोलपंप बंद राहिले.बीड बायपास रोडवरील म्हस्के पेट्रोलपंपासमोर दुपारी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पवार, आमदार सुभाष झांबड, डॉ. जितेंद्र देहाडे व पंकजा माने यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. कार्यकर्ते रस्त्यावरच झोपले होते. नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले.यात नगरसेविका सायली जमादार, प्रदेश महिला काँग्रेसच्या चिटणीस मीनाक्षी बोर्डे-देशपांडे, गुलाब पटेल, अ‍ॅड. सय्यद अक्रम, यशवंत कदम, राजूकाका नरवडे, नीलेश भाग्यवंत, मुसाभाई, हरिभाऊ राठोड, सलमान पटेल, प्रशांत सातपुते, अ‍ॅड. क्षितिजकुमार रोडे, श्रेयस नावंदर, फारुक पठाण, सरवर पटेल, सोनू पाईकडे, रज्जाक शेख, किरण मोरे आदींचा सहभाग होता. क्रांतीचौक पेट्रोलपंप परिसर दुमदुमलाक्रांतीचौक आज आंदोलनाचे मुख्य केंद्र ठरले. याच ठिकाणी मनसेने पेट्रोल-डिझेल दरवाढीविरुद्धचे अभिनव आंदोलन केले. याच ठिकाणाहून सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. याच परिसरातील पेट्रोलपंपावर काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी डॉ. पवन डोंगरे यांनी जोरदार नारेबाजी करून वातावरण निर्मिती केली. सचिन सावंत, आ. सुभाष झांबड, नामदेव पवार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी भेट देऊन आंदोलकांचा उत्साह वाढविला. या आंदोलनात किशोर तुळशीबागवाले, आतिश पितळे, अ‍ॅड. सुभाष देवकर, कैसर बाबा, इब्राहिम पठाण, मईन शेख हर्सूलकर, गणेश जाधव, आसाराम कणिसे, शिवाजी चिंचोले, सत्तार खान, अ‍ॅड. इगबालसिंग गिल, अजहरभाई, हिशाम उस्मानी, अजीज खोकर, सय्यद रियाज, संजय वाघमारे, रूपेश मोरे, सय्यद फय्याजोद्दीन आदींनी सहभाग घेतला.बाबा पेट्रोलपंप...बाबा पेट्रोलपंपासमोर शहर अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष बाबा तायडे व अश्फाक कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यात जयपाल दवणे, उत्तम दणके, सुनील साळवे, अशोक चक्रे, अरुण नंदागवळी, सिद्धार्थ सरवदे, अविनाश काळे, शिरीष चव्हाण, तुषार जाधव, यादर अहिरे, सुनील मघाडे, शकुंतला साबळे, माया बागूल, सागर भिंगारे, कैलास भुईगड, किशोर साळवे, राहुल भिंगारे, वैभव सुरासे, शरद जाधव, स्वप्नील शेवाळकर आदींनी सहभाग घेतला. माणुसकी म्हणून फक्त अ‍ॅम्ब्युलन्सना पेट्रोल भरू देण्यात आले.पीरिपाचा पाठिंबा...पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे भारत बंदला पाठिंबा देण्यात आला. जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, नंदकुमार हिवाळे, विजया दाभाडे, सुनीता काळे, बेबी मनोहर, रूपाली गायकवाड, रामदास लोखंडे, अशोक पठारे, सुभाष गवारे आदींनी भाववाढीबद्दल मोदी सरकारवर जोरदार टीका केली.एसबीईओसमोर निदर्शनेसिडको-हडको ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष शेषराव तुपे पाटील, नायबराव दाभाडे, बाबूराव कवसकर, शेख रईस, मुनीर पटेल, छाया मोडेकर, कल्याण कावरे, महेबूब बागवान, अशोक चव्हाण, चंद्रप्रभा खंडारे, योगेश भावसार, शेख सत्तार, रज्जाक चौधरी, धम्मा मोरे, शेषराव जाधव, शैलेश कनकुटे, शशिकांत पाटील, सुरेश काळुंके, भगवान रनबावळे, आकाश गायकवाड, ओम अर्जुने, विनोद गायकवाड, विशाल राऊत, रोहित काकडे, अनिकेत कर्डिले, उस्मान पटेल, सचिन पाटील, किरण कावरे राम खिल्लारे, सुरेश मिसाळ आदींनी जळगाव रोडवरील एसबीईओ शाळेसमोरील पेट्रोलपंपावर निदर्शने केली.राष्टÑवादीचे नाईक पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन‘वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू... महंगा तेल,’ ‘नरेंद्र मोदी हाय हाय, देवेंद्र फडणवीस हाय हाय,’ अशा घोषणा देत राष्टÑवादी काँग्रेसतर्फे सिडको बसस्टँडजवळील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन केले. शहर राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष काशीनाथ कोकाटे व शहर राष्टÑवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता भांगे आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.दुपारी राष्टÑवादी काँग्रेस आक्रमक बनली व कार्यकर्ते वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ एकवटू लागले. दररोज पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याने सर्वसामान्य जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. विकासाच्या कामाचा पत्ता नाही. जनतेची मात्र सरसकट लूट चालू आहे, अशी टीका कोकाटे व भांगे यांनी यावेळी केली.या ठिय्या आंदोलनात युवक कार्याध्यक्ष शेख कय्युम, शहर महिला अध्यक्षा मेहराज पटेल, माजी नगरसेवक मोतीलाल जगताप, विजय साळवे, अभिषेक देशमुख, सलीम पटेल वाहेगावकर, राजेश पवार, राजेंद्र नवगिरे, अय्युब खान, अमोल दांडगे, मुन्नाभाई, विलास ढंगारे, कैलास कुंटे, शेख मेहबूब, धनंजय मिसाळ, अमोल साळवे, अनिल डोंगरे, कन्हय्यालाल मिसाळ, राहुल येडे पाटील, किरण गवई, सोहेल सिद्दीकी, मंजूषा पवार, शमा बेगम, शकिला बेगम, संध्या शिरसाठ, पुष्पा जाधव, अश्रफ पटेल, प्रशांत जगताप, दिनेश नवगिरे, राहुल बनकर, शोभाताई गायकवाड, शेख रफिक, वसीम मणियार आदींसह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPetrolपेट्रोलcongressकाँग्रेसagitationआंदोलन