खामनदीतून पाईप चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 20:48 IST2019-01-20T20:47:46+5:302019-01-20T20:48:13+5:30
छावणी परिषदेने खामनदीत टाकलेले पाईप चोरांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.

खामनदीतून पाईप चोरीला
औरंगाबाद : छावणी परिषदेने खामनदीत टाकलेले पाईप चोरांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.
साडेतीन लाखांचे हे पाईप चोरांनी लांबविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. खामनदीचे पाणी वळविण्यासाठी छावणी परिषदेने ३० जानेवारी २०१८ रोजी पाईप टाकले होते. चोरांनी उत्खनन करुन नदीतील साडेतीन लाखांचे पाईप लांबवले. हा प्रकार २ जानेवारी रोजी लक्षात आला. छावणी परिषदेचे अधिकारी निलेश तनपुरे (४०) यांच्या तक्रारीवरुन छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.