धारूर येथे हनुमान मंदिरातील पंचधातूचा मुखवटा चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 11:58 IST2019-06-27T11:48:18+5:302019-06-27T11:58:15+5:30
व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेऊन चोरीचा निषेध केला आहे.

धारूर येथे हनुमान मंदिरातील पंचधातूचा मुखवटा चोरीला
बीड : धारूर शहरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या मंदिरातील हनुमान मूर्तीवरील पंचंधातुचा मुखवटा बुधवारी (दि. २७ ) रात्री चोरीस गेल्याचे उघडकीस आले. सकाळी ही बाब भाविकांच्या लक्षात येताच याची वार्ता सर्वत्र पसरली. यानंतर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेऊन चोरीचा निषेध केला.
मुख्य बाजारपेठेतील हनुमान मंदिरातील पंचधातूचा हा मुखवटा जवळपास 5 किलो वजनाचा आहे. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या अगोदरही शहरातील बालाजी मंदिरातून मूर्ती चोरीचा प्रकार घडला होता. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. घटना उघडकीस येताच या परिसरात काही काळ तणाव होता. पोलिसांसमोर चोरीचा तपास करणे मोठे आव्हान ठरत आहे.