शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

चोरी केली लहानपणी... पकडले गेले मोठेपणी!

By admin | Updated: July 24, 2014 00:40 IST

औरंगाबाद : सिडको एन-६ भागात पाच वर्षांपूर्वी चोरी करून फरार झालेल्या दोन चोरट्यांना काल सिडको पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद : सिडको एन-६ भागात पाच वर्षांपूर्वी चोरी करून फरार झालेल्या दोन चोरट्यांना काल सिडको पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी गुन्हा केला त्यावेळी अल्पवयीन होते. आता ते सज्ञान झाले आहेत.भगवान भानुदास घुगे (२१) व शंकर भानुदास घुगे (२२) अशी या आरोपींची नावे आहेत. दोघेही सख्खे भाऊ असून ते गेल्या काही महिन्यांपासून रांजणगाव परिसरातील पवननगरात राहत होते. या कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, २००९ साली सिडको एन-६ परिसरातील कमलाकर ज्ञाथी यांच्या घरी चोरी झाली होती.या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासात पाच चोरट्यांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातील तीन आरोपींना अटक झाली होती. उर्वरित दोन आरोपी फरार होते. ते दोन्ही आरोपी भगवान घुगे व शंकर घुगे हे होते. विशेष म्हणजे चोरी केली तेव्हा दोन्ही आरोपींचे वय अठरापेक्षा कमी होते. कायद्याच्या भाषेत ते अल्पवयीन होते. दरम्यान, सायबर क्राईमचे पोलीस कर्मचारी काल गस्त घालीत असताना भगवान संशयास्पद अवस्थेत फिरताना त्यांच्या नजरेस पडला. संशयावरून त्याला पकडण्यात आले. ‘खाक्या’ दाखवून विचारपूस करताच त्याने पाच वर्षांपूर्वी मी व भावाने साथीदारांच्या मदतीने सिडकोत घरफोडी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात आपण फरार होते, असेही त्याने सांगितले.लगेच सायबर क्राईमने त्याला सिडको पोलिसांच्या स्वाधीन केले. मग त्याचा भाऊ शंकर घुगेही पोलिसांना सापडला. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.