शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापकाविना स्टेट बँकेचा कारभार

By admin | Updated: December 5, 2014 00:54 IST

कडा: आष्टी या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत गेल्या तीन महिन्यांपासून मॅनेजर नसल्याने ग्राहकांची तारांबळ होत आहे

कडा: आष्टी या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत गेल्या तीन महिन्यांपासून मॅनेजर नसल्याने ग्राहकांची तारांबळ होत आहे. त्यामुळे ग्राहकांना आल्यापावली परत जाण्याची वेळ येत आहे. येथील राष्ट्रीयकृत बँकेतही ग्राहकांना मुलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. तालुक्यात सध्या पीक कर्ज, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, जनधन योजना यासारख्या अनेक कामांसाठी शेतकरी, ग्राहक मोठ्या संख्येने बँकेत येतात. मात्र व्यवस्थापकच नसल्याने अनेक कामे खोळंबत आहेत. तर येथील कर्मचारी, अधिकाऱ्यांवरही अंकुश न राहिल्याने ग्राहकांना आरेरावीची भाषा ऐकून घ्यावी लागत आहे. त्यामुळे बँकेत कामापेक्षा तक्रारीच अधिक होत आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या प्रश्नाकडे अद्यापर्यंत कोणीच लक्ष दिलेले नाही. पीक कर्जाच्या विविध फाईलसाठी शेतकऱ्यांची बँकेत ये- जा असते.मात्र कर्जाची पुर्तता न होता केवळ शेतकऱ्यांची पायपीटच होत आहे. शेतकऱ्यांची होणारी तारांबळ व आर्थिक भूर्दंड सहन करण्याची वेळ केवळ बँकेला मॅनेजर नसल्याने आली आहे. त्यामुळे हा प्रश्न त्वरित सोडवावा व ग्राहकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी जि.प. सदस्य रवी ढोबळे यांनी केली आहे. बँकेला त्वरित मॅनेजर मिळाला नाही तर शेतकऱ्यांना घेऊन बँकेला छावा संघटनेच्या वतीने कुलूप ठोकणार असल्याचे तालुकाध्यक्ष अशोक वाघुले यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांपासून मॅनेजर नसल्याने शैक्षणिक कर्जाची प्रकरणेही निकाली निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. (वार्ताहर)गेल्या तीन महिन्यांपासून येथील स्टेट बँकेच्या शाखेत व्यवस्थापकपदी कोणी नसल्याने बँकेचा कारभार हा प्रभारी व्यवस्थापक यांच्यावरच चालत आहे. वरिष्ठांकडून अद्यापर्यंत कोणतेही लेखी आदेश देण्यात आले नाहीत. सध्या तोंडी आदेशान्वयेच काम पाहत असल्याचे प्रभारी व्यवस्थापक बबन पाचपुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.