'जुनी पेन्शन योजना सुरू करा'; छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत कडकडीत बंद
By विजय सरवदे | Updated: March 14, 2023 13:35 IST2023-03-14T13:34:39+5:302023-03-14T13:35:25+5:30
सर्व कर्मचारी जि.प. मुख्यालयासमोर जमा झाले असून 'जुनी पेन्शन योजना सुरू करा'अशी घोषणाबाजी करीत निदर्शने करीत आहेत.

'जुनी पेन्शन योजना सुरू करा'; छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत कडकडीत बंद
छत्रपती संभाजीनगर : राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना व कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली जि.प., पं.स.चे सर्व कर्मचारी, सर्व शिक्षक संघटनांच्या शिक्षकांनी काम आंदोलन करून संपात सहभागी झाले आहेत. सकाळी ११ वाजेपासून सर्व कर्मचारी जि.प. मुख्यालयासमोर जमा झाले असून 'जुनी पेन्शन योजना सुरू करा'अशी घोषणाबाजी करीत निदर्शने करीत आहेत.
यात मध्यवर्ती संघटनेचे संजय महाळंकर जि.प. युनीयनचे प्रदीप राठोड, सुरेश गायकवाड, शिक्षक भारतीचे सुभाष महेर, संतोष ताठे, शिक्षक संघटनांचे दिलीप ढाकणे, श्रीराम बोचरे, शिक्षक सेनेचे महेश लबडे यांच्यासह विविध संवर्गाच्या सर्व संघटना सहभागी झाल्या आहेत.