धनगावात चारा छावणीला सुरुवात
By Admin | Updated: April 18, 2016 00:54 IST2016-04-18T00:54:32+5:302016-04-18T00:54:32+5:30
औरंगाबाद : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त वर्धमान संस्कार धाम मुंबई व जैन अलर्ट ग्रुपच्या वतीने पैठण तालुक्यातील धनगाव येथे गुरू गौतम गोसेवा ही चारा छावणी सुरू करण्यात आली आहे.

धनगावात चारा छावणीला सुरुवात
औरंगाबाद : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त वर्धमान संस्कार धाम मुंबई व जैन अलर्ट ग्रुपच्या वतीने पैठण तालुक्यातील धनगाव येथे गुरू गौतम गोसेवा ही चारा छावणी सुरू करण्यात आली आहे.
दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता गोधन वाचविण्यासाठी चारा छावणी सुरू करण्यात आली आहे. यावेळी वर्धमान संस्कार धामचे विपीन जैन, जयप्रकाश जैन व जैन अलर्ट ग्रुपचे सदस्य, तसेच सकल जैन समाजाचे महासचिव महावीर पाटणी, जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष मदनलाल आच्छा, कार्याध्यक्ष वृषभ कासलीवाल, विनोद बोकडिया, रवी मुगदिया, मिठालाल कांकरिया, अनिल संचेती, नीलेश सावलकर, चांदमल सुराणा, मुकेश सावजी, जी. एम. बोथरा, विशाल साहुजी तसेच धनगावचे सरपंच आदींची उपस्थिती होती. जैन अलर्ट ग्रुपच्या माध्यमाने काही गावे दत्तक घेतली असून, येथे दररोज दोन पाण्याचे टँकरसुद्धा पाठविण्यात येणार आहेत. तसेच १९ तारखेला गोशाळा, चारा छावण्यांना ५१ गाड्या चारा देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.