शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाचा आंधळा कारभार !

By admin | Updated: December 13, 2014 23:50 IST

सूर्यकांत बाळापूरे , किल्लारी प्रवाशांच्या सेवेसाठी असे ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या आंधळ्या कारभारामुळे प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़

सूर्यकांत बाळापूरे , किल्लारीप्रवाशांच्या सेवेसाठी असे ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या आंधळ्या कारभारामुळे प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़ परिणामी, अवैध वाहतुकीकडे प्रवाशांचा कल असल्याचे पहावयास मिळत आहे़एसटी प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो़ विशेषत: ग्रामीण भागाच्या विकासासाठी महाराष्ट्र एसटी महामंडळाचे योगदान महत्त्वाचे मानले जाते़ त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा खाजगी वाहतुकीपेक्षा एसटीने प्रवास करण्यावर सर्वाधिक भर असल्याचे पहावयास मिळते़ परंतु, एसटी महामंडळाच्या आंधळ्या कारभारामुळे प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ गेल्या ६४ वर्षांपासून एसटी महामंडळ कार्यरत आहे़ त्यामुळे प्रवाशांच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत़ त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्नशील असले तरी काही बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे पहावयास मिळत आहे़ गेल्या तीन - चार महिन्यांच्या कालावधीत डिझेलच्या दरात जवळपास ६ ते ७ रुपयांनी कपात झाली आहे़ परंतु, एसटी महामंडळ तिकीटाचे दर करण्यास टाळत आहे़ एखाद्यावेळी डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर हेच कारण पुढे करीत तिकीटाच्या दरात एसटी महामंडळ वाढ करते़ परंतु, डिझेलचे दर कमी झाले असतानाही दरात कपात केली जात नाही़ परिणामी, प्रवाशी एसटी ऐवजी खाजगी वाहतुकीकडे वळत आहेत़ त्याचबरोबर अपंग, महिला, ज्येष्ठ नागरिक, आमदार आदींसाठी बसमध्ये राखीव आसन असतात़ हे राखीव आसन ओळखता यावे म्हणून आसनाच्या वरील बाजूस ठळक अक्षरात लिहिलेले असतेही़ परंतु, या राखीव जागांवर अन्यच मंडळी बसलेले पहावयास मिळतात़ परिणामी, ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंगांना अनेकदा उभारुन प्रवास करावा लागतो़ एखाद्याने तक्रार केल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते़ त्यामुळे जर हे राखीव आसन नसतील तर आसनावर लिहून प्रवाशांची दिशाभूल कशासाठी करायची असा सवाल होत आहे़ अनेकदा बसचालक व वाहक थांब्यावरही बस थांबविण्यास टाळाटाळ करीत असतात़ त्यामुळे अनेकदा विनंती करावी लागते़या मार्गावरुन धावणाऱ्या बहुतांशी बससेमध्ये कचरा पडलेला असतो़ वास्तविक पहाता, एसटी बसेसची दररोज स्वच्छता करणे आवश्यक आहे़ बसची दररोज स्वच्छता करण्यात यावी म्हणून प्रत्येक नवीन बसला केरसुनीही देण्यात येते़ परंतु, ही कुठे गायब झालेली असते़ हा संशोधनाचा विषय ठरत आहे़ त्यामुळे प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़४डिझेलचे दर कमी झाल्याने तिकीट दरात कपात करावी, अशी प्रवाशांतून मागणी होत आहे़ परंतु, तिकीट दर कमी करण्याचा निर्णय हा महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे घेते़ त्याचबरोबर बसमधील आसन राखीव ठेवण्यासाठी त्याची नोंद करणे आवश्यक असल्याचे एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक डी़ बी़ माने यांनी सांगितले़