शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी वाहक-चालकाचा प्रामाणिकपणा

By admin | Updated: August 17, 2014 01:45 IST

एसटी वाहक-चालकाचा प्रामाणिकपणा

औरंगाबाद : पत्नीच्या उपचारासाठी नातेवाईकांकडून जमा करून आणलेले ५५ हजार रुपये एका बॅगमध्ये ठेवलेले असताना ती बॅग एका प्रवाशाकडून चुकून बऱ्हाणपूर-औरंगाबाद बसमध्येच राहिली; परंतु एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानकातील वाहक-चालकांनी सतर्क राहून सदर बॅग आगारात जमा करून प्रामाणिकपणा दाखविला.बऱ्हाणपूर-औरंगाबाद बसचे चालक सिद्धार्थ गणपत गायकवाड आणि वाहक विजय पांडुरंग जाधव अशी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. बऱ्हाणपूर-औरंगाबाद बस शुक्रवारी दुपारी जळगाव येथे आल्यानंतर येथे चालक-वाहक आगारात नोंद करण्यासाठी गेले. नोंद करून जळगावपासून दहा कि.मी. अंतरावर गेल्यावर चालकाच्या पाठीमागील सीटवर बेवारस बॅग असल्याचे वाहक विजय जाधव यांच्या लक्षात आले. ही बाब त्यांनी चालक सिद्धार्थ गायकवाड यांच्या लक्षात आणून दिली. यावेळी बॅगविषयी प्रवाशांकडे विचारणा करण्यात आली; परंतु बॅग कोणाची आहे, याविषयी माहिती न मिळाल्याने दोघांनीही ही बाब आगार व्यवस्थापक प्रताप जाधव यांना दिली. यावेळी वाहक-चालकांनी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये रोख रक्कम असल्याचे आढळले. दरम्यान, ज्या प्रवाशाची ही बॅग होती त्याने जळगाव आगारात बसमध्ये बॅग राहिल्याबाबत तात्काळ माहिती दिली. त्यानंतर चालक-वाहकांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी ही बॅग मध्यवर्ती बसस्थानकात जमा केली. यावेळी ओळख पटल्यानंतर बॅग सदर वरिष्ठ आगार व्यवस्थापक प्रताप जाधव यांनी प्रवाशाच्या नातेवाईकाला दिली. संशयित वस्तूबाबत सतर्क राहणारे आणि प्रामाणिकपणा दाखविणारे चालक सिद्धार्थ गायकवाड आणि वाहक विजय जाधव यांचा शनिवारी प्रताप जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रशिक्षणाचा फायदाएसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना नुकतेच संशयित वस्तूंबाबत कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. आपणही हे प्रशिक्षण घेतले आहे. संशयित वस्तूंबाबत तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती दिली जाते. बसमध्ये बेवारस बॅग असल्याने काही वेळेसाठी भीती वाटली; मात्र बॉम्बसदृश बॅग कशी असू शकते, याची माहिती असल्याने योग्य काळजी घेतल्याचे चालक सिद्धार्थ गायकवाड यांनी सांगितले.