शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

SSC Result 2020 : औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९२ टक्के; विभागात दुसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 7:58 PM

तब्बल १९ हजार ६१५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेत प्रावीण्य श्रेणी पटकावली.

ठळक मुद्देमुलींची आघाडी कायममुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.७२ मुलींची ९५.१ टक्के

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक  शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९२.१० टक्के लागला आहे. विभागात औरंगाबाद  जिल्ह्याला दुसरा क्रमांक मिळाला आहे, तर प्रथम क्रमांक जालना जिल्ह्याने पटकावला आहे. जिल्ह्याच्या निकालात मुलींची आघाडी कायम आहे.

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल विभागीय सचिवांनी बुधवारी दुपारी जाहीर केला. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी ६४ हजार ८७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ६४ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ५९ हजार ५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.१० एवढी आहे.  जिल्ह्यात परीक्षा दिलेल्या ६४ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३५ हजार ५११ मुले आणि २९ हजार ११७ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ३१ हजार ८६० मुले, तर २७ हजार ६६३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.  मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.७२ आहे, तर मुलींची ९५.१ एवढी आहे. मुलांच्या तुलनेत ५.२९ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत. पुनर्परीक्षार्थींमध्ये  ४ हजार ८७९ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ३५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  ही टक्केवारी ६८.८३ एवढी आहे.

१९००० हजार विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्णऔरंगाबाद जिल्ह्यात एकूण ५९ हजार ५२३ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १९ हजार ६१५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेत प्रावीण्य श्रेणी पटकावली. २१ हजार ३११  विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीत १४ हजार ६०९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर ३ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. औरंगाबाद  विभागात ५२ हजार ७७७ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी मिळविली आहे.

कमी नव्हे, खरा निकाल लागला औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल कमी लागला असेल; पण तो खरा निकाल आहे. खोट्या निकालाची विद्यार्थ्यांना गरज नाही. परीक्षेत गैरप्रकार करून निकाल वाढवला जात होता. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात राबविलेल्या कॉपीमुक्त मोहिमेमुळे निकाल कमी लागला असेल; पण विद्यार्थ्यांची ही खरी गुणवत्ता आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात खऱ्या निकालाची आवश्यकता आहे. त्यात औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमिकचे शिक्षणाधिकारी  डॉ. बी.बी. चव्हाण यांनी दिली. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र