शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

SSC Exam: गैरप्रकारातून मिळविलेल्या फुगवट्यापेक्षा विद्यार्थ्यांनो, प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे जा

By योगेश पायघन | Updated: March 1, 2023 18:28 IST

गैरप्रकारातून मिळविलेल्या फुगवट्यापेक्षा विद्यार्थ्यांनो, प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे जा...

छत्रपती संभाजीनगर :दहावीच्या गुणांमध्ये गैरमार्गाने मिळविलेला फुगवटा पुढील शैक्षणिक व आर्थिक नुकसान देणारा ठरेल, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्या. विद्यार्थ्यांना प्रामाणिक मूल्यांकनाला सामोरे न्या, गैरमार्गापासून रोखा. निर्भय वातावरणात परीक्षा पार पाडण्याच्या सूचना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपसंचालक अनिल साबळे यांनी केंद्रप्रमुखांना दिल्या आहेत. गुरुवारपासून विभागातील ६२९ केंद्रांवर १.८० लाख विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. त्याच्या तयारीची लगबग शाळांसह, बोर्डात बुधवारी उशिरापर्यंत सुरू होती.

बोर्डाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. नांदेड पॅटर्ननुसार कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. १० फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर सुरू होत असलेल्या लेखी परीक्षेत २,६१४ शाळांतील ९९ हजार ५४९ विद्यार्थी तसेच ८० हजार ६६१ विद्यार्थिनी असे एकूण १ लाख ८० हजार २१० परीक्षार्थी ६२९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. गुरुवारपासून सुरू होणारी ही परीक्षा २५ मार्चपर्यंत असेल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन, झडती आणि गैरप्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी शाळा, परीक्षा केंद्रांवर देण्यात आली आहे. दहावीतील गुणांच्या फुगवट्याने पुढे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करण्यावर भर देण्याच्या सूचनाही पर्यवेक्षकांना करण्यात आल्या आहेत.

जि. प. अधिकाऱ्यांसह महसूलच्या पथकांची नजरकाॅपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षेसाठीची जय्यत तयारी विभागीय मंडळ आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. त्यावर जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांना संपर्कप्रमुख म्हणून नेमण्यात आले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या १० पथकांची नजर परीक्षेवर असणार आहे. परीक्षेच्या आधी एक तास व परीक्षेनंंतर एक तास सर्वच परीक्षा केंद्रांवर बैठे पथक नेमण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वास विभागीय सचिव विजय जोशी यांनी व्यक्त केला आहे.

...तर पर्यवेक्षक अन् केंद्रप्रमुखांवरही कारवाईजिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची १० भरारी पथके, जिल्ह्यातील १७ संवेदनशील केंद्रांवर विशेष बैठे पथके, शिक्षण विभागाची ६ भरारी पथके तसेच महिलांची २ स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षेत गैरप्रकार घडू नये, त्यासाठी विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे, भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडणे, झडती घेऊनच परीक्षार्थ्यांना प्रवेश आणि केंद्रावर गैरप्रकार झाल्यास पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुखांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, याची जाणीव सर्व केंद्रप्रमुखांना करून दिली आहे.- एम. के. देशमुख, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, औरंगाबाद

विभागीय मंडळातील जिल्हानिहाय आकडेवारीजिल्हा - परीक्षा केंद्र - विद्यार्थी - विद्यार्थिनी - एकूण परीक्षार्थीछत्रपती संभाजीनगर - २२७ - ३५३२९ - २९२६४ - ६४५९३बीड - १५६ -२३७६४ - १७१५७ - ४१५२१जालना - ९३ - १५२०३ - १२५९७ - २७८००परभणी - १०० - १६९४३ - १३७४२ - ३०६७६हिंगोली - ५३ - ८३१९ - ७३०१ - १५६२०

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादssc examदहावीEducationशिक्षण