शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

स्पाईस जेटच्या परिस्थितीने प्रवाशांची वाढविली चिंता

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

औरंगाबाद : देशभरासह शहरातील स्पाईस जेटचे विमान सलग दुसऱ्या दिवशीही रद्द झाले.

औरंगाबाद : देशभरासह शहरातील स्पाईस जेटचे विमान सलग दुसऱ्या दिवशीही रद्द झाले. स्पाईस जेटच्या अशा परिस्थितीने आगामी दिवसातील तिकीट बुक केलेल्या प्रवाशांमध्ये चिंता वाढली आहे. विमानतळावरील स्पाईस जेटच्या कक्षाशी संपर्क साधून पुढील उड्डाण रद्द आहे का, अशी शंका प्रवाशांकडून विचारली जात आहे.तेल कंपन्यांनी पैसे भरल्यावरच इंधन देण्याचा पवित्रा घेतल्यामुळे स्पाईस जेटची अनेक विमाने रद्द होत असल्याचे दिसून आले. बुधवारी देशभरात जवळपास २५१ विमाने रद्द झाली. यामध्ये चिकलठाणा विमानतळावरून दिल्लीस जाणारे विमान सलग दोन दिवस रद्द झाले. या दोन्ही दिवशी विमान रद्द होण्याची माहिती ऐनवेळी देण्यात आल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्पाईस जेटच्या विमानसेवेच्या अशा परिस्थितीने आगामी दिवसांत दिल्ली जाण्यासाठी बुकिंग केलेल्या प्रवाशांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. अल्प दरात तिकीट मिळण्यासाठी अनेकांकडून महिना, दोन महिन्यांआधी तिकीट बुक करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे ऐनवेळी विमान रद्द झाल्याचे ऐकण्याऐवजी आधीच खबरदारी म्हणून बुधवारी अनेकांनी स्पाईस जेटशी संपर्क साधला. यावेळी उद्याचे विमान रद्द होणार का अशी विचारणा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. विमान रद्द होणार असेल, तर प्रवासासाठी दुसरी सोय करता येईल, असा विचार प्रवाशांकडून केला जात होता.ऐनवेळी दर वाढविलेप्रवाशांची संख्या वाढण्याने अन्य विमानसेवा कंपन्यांनी आपले दर अचानक वाढविले आहे.