शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जागा हडपण्याचा डाव

By admin | Updated: December 18, 2014 00:42 IST

औरंगाबाद : क्रांतीचौक येथील नगर भूमापक क्रमांक १७३३५ या मिळकतीवर २००२ च्या सुधारित विकास आराखड्यानुसार तीन प्रकारचे आरक्षण टाकण्यात आले आहे.

औरंगाबाद : क्रांतीचौक येथील नगर भूमापक क्रमांक १७३३५ या मिळकतीवर २००२ च्या सुधारित विकास आराखड्यानुसार तीन प्रकारचे आरक्षण टाकण्यात आले आहे. ते आरक्षण उठविण्याच्या हालचाली पालिकेने ११ नोव्हेंबरच्या सभेत ऐनवेळी प्रस्ताव घुसवून पूर्ण करून घेतल्या. अब्जावधी रुपये किमतीच्या त्या जागेवरील आरक्षण उठविण्याचा डाव पालिकेने कशासाठी घातला हा प्रश्न आहे. ठरावाचा कारणापुरता उतारा काढण्यात आला असून, तो संबंधित जागा मालक व प्रशासनाकडे गेल्याचे वृत्त आहे. सामाजिक उपयोगाच्या जागेवरील आरक्षण उठविण्याच्या प्रकाराला कोर्टाने चाप बसविलेला असताना कोर्ट आदेशाच्या अधीन राहून प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. नगरसेवक सूर्यकांत जायभाये हे सूचक तर सभापती विजय वाघचौरे, अशोक बेहडे हे प्रस्तावाचे अनुमोदक आहेत. महापौर कला ओझा यांनी नियमाने कार्यवाही करावी, असे आदेश देऊन विषयाला मंजुरी दिली आहे. या ठरावाचे इतिवृत्त २० डिसेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरील जागेवर तीन प्रकारचे आरक्षण आहे. आरक्षण क्र.३१० हे शॉपिंग सेंटरचे आहे. आरक्षण क्र.३१० ए पार्किंगसाठी तर आरक्षण क्र.३११ उद्यानासाठी टाकण्यात आले आहे. जागा मालकाने पालिकेकडे मोबदल्यासाठी अर्ज केल्याचा उल्लेख इतिवृत्तामध्ये नाही. भूसंपादन करण्यासाठी पत्रव्यवहार केल्याचाही त्यात उल्लेख नाही, असे असताना संबंधित जागा मालकासाठी तो ठराव मंजूर करण्याच्या हालचाली सत्ताधाऱ्यांनी कशासाठी सुरू केल्या आहेत. त्या आरक्षणात फेरबदल केल्यास शहराच्या विकासात भर पडेल, असे ठरावात म्हटले आहे. गेल्यावर्षी नगररचना विभागाने कांचनवाडी, नक्षत्रवाडी येथील ५५ एकर जागेवरील आरक्षण उठविण्याचा प्रस्ताव सभेत आणला होता.