शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

तूर्त प्रशासकीय नगराध्यक्ष

By admin | Updated: July 6, 2014 00:23 IST

जालना : जिल्ह्यातील चारही नगरपालिकांमधील विद्यमान नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपला असून या पदाच्या निवडणुका १६ जुलै रोजी घेण्यात येणार आहेत.

जालना : जिल्ह्यातील चारही नगरपालिकांमधील विद्यमान नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपला असून या पदाच्या निवडणुका १६ जुलै रोजी घेण्यात येणार आहेत. दरम्यान, चारही नगरपालिकांमध्ये प्रशासकीय नगराध्यक्ष म्हणून शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा व त्यापाठोपाठ पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्याने या दोन्ही निवडणुकांसाठीचा काळ आचारसंहितेत गेल्याने मुदतवाढ देण्याची मागणी राज्यातील नगराध्यक्षांनी केली होती. त्यावर शासनाने नगराध्यक्ष पदासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेतला होता. नगराध्यक्षांना जीवदान मिळाले होते. परंतु न्यायालयाच्या निर्देशानंतर शासनाने नगराध्यक्ष पदाच्या मुदतवाढीचा निर्णय रद्द करून या पदाची निवडणूक घेण्याचे नगरपालिकांना आदेश दिले. त्याप्रमाणे नगराध्यक्षपदाची निवडणूक १६ जुलै रोजी होणार असून त्यासाठी ११ जुलै रोजी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जालना नगरपालिकेच्या अध्यक्षा पद्मा भरतिया यांचा कार्यकाळ २६ जून २०१४ रोजी संपलेला आहे. परंतु शासनाने मध्यंतरी दिलेला मुदतवाढीचा निर्णय व आता तो रद्द करण्याचा निर्णय यामुळे ४ जुलैपर्यंतचा कार्यकाळ भरतिया यांच्याकडे होता. नगरविकास खात्याच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय अध्यक्ष म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांची नियुक्ती केली आहेइच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरुजिल्ह्यातील चारही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर विविध राजकीय पक्षांनीही हालचाली सुरू केल्या आहेत.भोकरदन - नगराध्यक्षा अर्चना चिने यांचा कार्यकाळ संपला असून प्रशासकीय अध्यक्ष म्हणून तहसीलदार रुपा चित्रक यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, शनिवारी सायंकाळपर्यंत याबाबतचे कुठलेही आदेश नगरपालिकेला प्राप्त झाले नव्हते. अंबड/परतूर - या दोन्ही नगरपालिकांमध्ये प्रशासकीय अध्यक्षांची निवड शनिवारी उशिरापर्यंत झालेली नव्हती.