शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

जिल्हा रूग्णालयातील ‘सोनोग्राफी’ मशीन बंद

By admin | Published: October 31, 2014 12:23 AM

उस्मानाबाद : अनेक समस्यांनी ग्रासलेल्या जिल्हा रूग्णालयातील सोनोग्राफी मशीनही गत पंधरा दिवसांपासून बंद पडली आहे़ सोनोग्राफी मशीन बंद पडल्याने खासगी दवाखान्यात शेकडो रूपये खर्च करून

उस्मानाबाद : अनेक समस्यांनी ग्रासलेल्या जिल्हा रूग्णालयातील सोनोग्राफी मशीनही गत पंधरा दिवसांपासून बंद पडली आहे़ सोनोग्राफी मशीन बंद पडल्याने खासगी दवाखान्यात शेकडो रूपये खर्च करून खेटे मारावे लागत आहेत़वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, कर्मचाऱ्यांचा अभाव यासह इतर अनेक समस्यांनी जिल्हा रूग्णालयाला ग्रासले आहे़ जिल्हा रूग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांसह इतर विविध आजाराचे रूग्ण दररोज उपचारासाठी येतात़ यातील बहुतांश रूग्णांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो़ त्यातच गत काही दिवसांपासून येथील सोनोग्राफी मशीन बंद पडली आहे़ सोनोग्राफी मशीन बंद असल्याने तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांसह विविध योजनांतील लाभार्थ्यांना खासगी रूग्णालयात पैसे मोजून तपासणी करावी लागत आहे़ पोटाचे विविध विकाराने जखडलेल्या रूग्णांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे़ जवळपास निम्मा महिना लोटत आला तरी अद्यापही ही मशीन सुरू झालेली नाही़ मशीन बंद असल्याने जवळपास ४०० ते ८०० रूपयांपर्यंचा खर्च विविध तपासण्यांसाठी रूग्णांना करावा लागत आहे़ ३० ते ४० रूपयांमध्ये होणाऱ्या तपासणीसाठी शेकडो रूपये मोजावे लागत असल्याने संताप व्यक्त होत असून, संबंधितांनी याकडे लक्ष देवून सोनोग्राफी मशीन सुरू करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)