शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

हळू याना गं लाटांनो, इथे निजला भीम माझा, तयाला जाग येईल ना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 1:45 PM

हा प्रज्ञासूर्य अस्ताला निघाला, तेव्हा जनमानस धायमोकलून रडत होते. बावरले, घाबरले होते. या प्रत्येक भावनांना कवींनी शब्दरूप प्रदान केले. त्यातून या युगपुरु षाच्या निर्वाणाची हजारो गीते तयार झाली.

ठळक मुद्देआजही सतत नवनव्या भावना, रूप घेऊन महापुरूषांची चंदनाची चिता कवी, शाहिरांना प्रेरणा देतच आहे. आशयपूर्ण गीतांनी जनमानसाच्या मनावर अक्षरश: राज्य केले.

- शांतीलाल गायकवाड  

औरंगाबाद : 

‘हळू याना गं लाटांनोकुणाला त्रास होईल नाइथे निजला भीम माझातयाला जाग येईल ना...’

महाकवी वामनदादा कर्डकांच्या संवेदनशील लेखणीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली ही चिंब अश्रूफुले. सद्गतीत होऊन कंठ दाटून यावा अशी भावपूर्ण आदरांजली. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत लाखो गीते, कवणे, शेर, गजला कवींनी लिहिली. गायक, शाहिरांनी गायली. या आशयपूर्ण गीतांनी जनमानसाच्या मनावर अक्षरश: राज्य केले. हा प्रज्ञासूर्य अस्ताला निघाला, तेव्हा जनमानस धायमोकलून रडत होते. बावरले, घाबरले होते. या प्रत्येक भावनांना कवींनी शब्दरूप प्रदान केले. त्यातून या युगपुरु षाच्या निर्वाणाची हजारो गीते तयार झाली. आजही सतत नवनव्या भावना, रूप घेऊन महापुरूषांची चंदनाची चिता कवी, शाहिरांना प्रेरणा देतच आहे. 

दादरच्या सागर किनारी बाबासाहेबांचा पवित्र देह ठेवण्यात आला. बाबासाहेबांनी उभ्या हयातीत केलेल्या अथक परिश्रमावर वामनदादा पुढे लिहितात,

अशा किती तरी रात्री तयाला झोप आली ना जरासा लागला डोळातयाची झोप मोडेल ना...नकारे आसवे ढाळू इथेवामनवाणी आता तुमच्या त्या आसवांनी रे चिता ही ओली होईल ना....

वामनदादांनी बाबाच्या महापरिनिर्वाणावर शंभराहून अधिक गीते लिहिली आहेत. भीमराव दीनदलित व महिलांसाठी लढले. देह चंदनासम झिजवला. वामनदादा लिहितात, 

देह झिजला कसाअंत झाला कसाचंदनाला पुसा, चंदनाला पुसा,देहसारा भीमाचा थिजला कसाचंदनाला पुसा, चंदनाला पुसा 

बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेसाठी मुंबईत अथांग जनसागर लोटला. आक्रोश आणि भावविव्हळ न थांबऱ्या वेदना घेऊनच. कुण्या नेत्याच्या अंत्ययात्रेला झालेल्या गर्दीचा तो विश्वविक्रमच होता. एक कवी भावना व्यक्त करतो. ‘बाबांची डोली निघाली, अश्रू ढाळी, दलित जणांची माया ही निराळी.’ 

६ डिसेंबर ५६ रोजी बाबा गेल्याची वार्ता कळली व मेघडंबर हेलावले. कवी दिलराज भावूक होऊन व्यक्त होतात, 

‘सहा डिसेंबर छप्पन सालीवेळ कशीही हेरलीदुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली...रडे जनता टाहो फोडुनीचैत्यभूमी सागरा तिरीरात्र सहा डिसेंबरचीजीवनी राहिली चिरंतनी  एक अनाम कवी लिहितो....बाबा गेले वार्ता कळलीपायाची जमीन ढासळलीलोकांचे काळीज हादरलेझाले वेडे जन बावरले नरनारी सारे थरथरले काहीच सुचेना घाबरलेकैकांचे भानच गरगरलेआक्रोशाचे वादळ उठलेटाहोचे आभाळ गडगडले कुणी धरतीवर लोळत पडले....

कवी काशीनंदा यांना मात्र बाबासाहेबांची ती चंदनाची चिताही मुलांना संदेश देतेय असा भास होतोय, त्यांच्या भावना गायक मनोहरदीप रुसवा (भगत) अशा ओथंबलेल्या शब्दात गातात....

पेटता पेटता बोलली रे चिताजा मुलांनो आता संपली रे कथासंपल्या संपुद्या अश्रूच्या अक्षदा लाभली ती योग्य सद्गती...शब्द मोडू नका, ऊर झोडू नकाजा भविष्यामध्ये धीर सोडू नका....

उसळलेल्या जनसागराची तळमळ होती त्या भीमराणाची अभा एकदा तरी पाहण्याची. त्यासाठीची मनामनात, तनातनात सुरू असलेली धडपड एक कवी, ‘थांबा थांबा, जाळता का चंदनाची ही चिता, पाहू द्या डोळे भरूनी मज भीम हा माझा पिता,’ अशी व्याकूळ नोंदवितो. बाबांनी अतिश्रम केले. २०-२० तास वाचनलेखन करणारे बाबासाहेब तहानभूक विसरून जात. त्यातून त्यांना अनेक व्याधी जडल्या. बाबासाहेबांच्या अंतिम दिनाविषयी शाहीर साळवे म्हणतात, 

गेला भीमराणाकसा सोडून गेला दलितांचा राणामधुमेह, रक्तदाब वाढलापायांचा आजार वाढू लागलादृष्टी मंद झाली ना...

बाबासाहेबांच्या महानिर्वाणाबद्दल काही प्रवादही आहेत. त्याकडे कवींची नजर न गेली तरच नवल, गायक प्रकाशनाथ पाटणकर म्हणतात, 

घात झाला जी...नानकचंद रत्तू हे वदलामृत्यू होता की होता बदला प्रश्न गुपित आहे जी घात झाला जी...,  

अशीही शेकडो गीते तत्कालीन समाजमनावर बिंबलेली आहेत. कवी राजानंद गडपायले लिहितात,

स्मशानी आहे रे दर्याकिनारी जाऊनी आलोचितेवर देह बाबांचा मी जळता पाहूनी आलो... 

सागर किनारी चैत्यभूमीत प्रज्ञेचा सागर चिरनिद्रा घेत आहे. खळखळत्या सागरी लाटा घोंगावता आवाज करीत येतात वारंवार. अनेकदा हा सागर रौद्ररुप घेतो. त्याच्या या रुपाला पाहून एक कवी लिहितो ,   

अरे सागरा, भीम माझा येथे निजला शांत हो जरादीनासाठी कष्ठ साहिले माझ्या भीमानेहक्क मिळवून दिले मोठ्या श्रमानेसोडून गेली गाई आपल्या वासरा... 

खरंच तोड नाही हो जगात करणीला एक हिऱ्याने दीपावले धरणीला, असे म्हणत गेल्या ६१ वर्षापासून सतत दरवर्षी देशभरातून लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी चैत्यभूमीवर जातात. आपल्या लाडक्या बाबाला अभिवादन करतात. बाबांची ही समाधी असंख्य दीनदुबळ््या, वंचितांची प्रेरणा, ऊर्जास्थान आहे. त्यावर महाकवी वामनदादांची एक अजरामर गजल अशी,

समाधीकडे ती वाटही वळावीतेथे आसवांची फुले ही गळावी...

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरliteratureसाहित्यmusicसंगीत