शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

सोमनाथ सूर्यवंशी काेठडीतील मृत्यू; मागदर्शक तत्त्वांबाबत मुख्य सचिवांनी शपथपत्र दाखल करावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 15:36 IST

सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाचे आदेश, पुढील सुनावणी १० ऑक्टोबरला

छत्रपती संभाजीनगर : काेठडीतील मृत्यूबाबत मागदर्शक तत्त्वे निश्चीत करण्यासंदर्भात मुख्य सचिवांनी ३ ऑक्टोबरपर्यंत सुस्पष्ट शपथपत्र दाखल करावे, असे आदेश मूंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेन वेनेगावकर यांनी शुक्रवारी (दि. १२) परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशीच्या काेठडीतील मृत्यूसंदर्भातील सुनावणीदरम्यान दिले. पुढील सुनावणी १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.

नियमावलीबाबत विनंतीसोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूनंतर आई विजयाताई यांनी १८ डिसेंबर २०२४ ला पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही, म्हणून याचिका दाखल करून यातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा ही प्रमुख मागणी केली होती. बीएनएसएस (भारतीय न्याय संहिता) कायद्याच्या कलम १९६ नुसार न्यायालयीन कोठडीत एखाद्याचा मृत्यू झाल्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी (जेएमएफसी) त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची तरतूद या कलमात आहे. मात्र, त्यानंतरची पुढची पावले काय उचलावीत, याबाबत कायद्यात कुठलेही निर्देश नाहीत. त्यामुळे पुढील कार्यवाही कशी व्हावी, यासंदर्भात न्यायालयाने विचार करून नियमावली करावी, अशी विनंती केली होती.

कायद्यात सुस्पष्टता असावी - ॲड. आंबेडकरयाबाबत खंडपीठात वेळोवेळी सुनावणी झाली. मागील सुनावणीत एसआयटी स्थापन करण्याचे खंडपीठाने आदेश दिले होते. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत विजया सूर्यवंशी यांच्यातर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. कोठडीतील मृत्यूच्या प्रकरणात ‘कायद्यात सुस्पष्टता असली पाहिजे’, असा युक्तिवाद त्यांनी केला. या पूर्वीच्या सुनावणीच्या अनुषंगाने शासनातर्फे शपथपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र, ते शपथपत्र स्पष्ट नसल्याने खंडपीठाने मुख्य सचिवांनी ३ ऑक्टोबरपर्यंत सुस्पष्ट शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना ॲड. मिलिंद संदानशिव यांनी सहकार्य केले. राज्य शासनाकडून मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी