शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'मंत्र्यांना बोलवा!' सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:46 IST

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण: प्रकाश आंबेडकरांची सरकारवर प्रखर टीका; उद्या पुन्हा महत्त्वाची सुनावणी

छत्रपती संभाजीनगर: राज्यभर गाजत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी पोलीस विभाग आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "सरकारची न्यायालयाचे आदेश पाळण्याची इच्छाच दिसत नाही," अशा कडक शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

कायद्यातील त्रुटींवर ठेवले बोट प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात दोन प्रमुख मुद्दे मांडले. भारतीय दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १९६ (कलम १७६ चे सुधारित संदर्भ) नुसार कोठडीतील मृत्यूची चौकशी अनैसर्गिक म्हणून केली जाते, पण त्यानंतर दोषींवर काय कारवाई करायची, याबाबत कायदा मौन असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. केंद्र आणि राज्य सरकारने या संदर्भात अद्याप कोणतीही दुरुस्ती केलेली नाही, ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

"मंत्र्यांनाच न्यायालयात पाचारण करा"आंबेडकर पुढे म्हणाले की, न्यायालयात हजर होणाऱ्या अधिकाऱ्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नसतात. त्यामुळे जर हा कायदेशीर पेच सोडवायचा असेल, तर न्यायालयाने थेट संबंधित खात्याच्या मंत्र्यांना बोलावून 'अपुरा कायदा कधी पूर्ण करणार?' असा सवाल विचारला पाहिजे. सरकारला आणखी एक संधी द्यायची असेल तर ती मंत्र्यांच्या उपस्थितीतच द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची गंभीरता पाहता, न्यायालयाने उद्या (गुरुवारी) या केसची सुनावणी प्रथम क्रमांकावर ठेवली आहे. उद्याच्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Summon Ministers! Prakash Ambedkar's Aggressive Stance on Suryavanshi Case

Web Summary : Prakash Ambedkar demands ministers' presence in court regarding Somnath Suryavanshi's custodial death. He criticizes legal loopholes and government inaction, urging the court to question ministers directly about incomplete laws. The court has prioritized the case for tomorrow's hearing.
टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी