विनयभंगाच्या आरोपावरून सैनिकाला अटक
By | Updated: December 4, 2020 04:04 IST2020-12-04T04:04:03+5:302020-12-04T04:04:03+5:30
गुजरातेत कोरोनाचे १,५१२ नवे रुग्ण अहमदाबाद : गुजरातेत बुधवारी कोरोनाचे १,५१२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ...

विनयभंगाच्या आरोपावरून सैनिकाला अटक
गुजरातेत कोरोनाचे १,५१२ नवे रुग्ण
अहमदाबाद : गुजरातेत बुधवारी कोरोनाचे १,५१२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता २,१२,७६९ एवढी झाली आहे. तर बुधवारी १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ४,०१८ वर गेली आहे. राज्यात एकूण १,९३,९३८ जण बरे झाले आहेत.
पोटनिवडणुकांमध्ये ५२ टक्के मतदान
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पंचायतस्तरीय पोटनिवडणुकांमध्ये दुसऱ्या टप्प्यात ५२ टक्के मतदान झाले. रिक्त जागांसाठी ६५.५४ टक्के तर सरपंचपदांसाठी ५२.२४ टक्के मतदान झाले. काश्मीरमध्ये ३४३ जागांसाठी तर जम्मूमध्ये २६ जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या होत्या.
ले. उमर फैयाज स्मृती पुरस्कार सुरू
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने काश्मीरमधील युवा सैन्य अधिकारी ले. उमर फैयाज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक पुरस्कार सुरू केला आहे. ले. फैयाज (२२) यांचे साडेतीन वर्षांपूर्वी अतिरेक्यांनी अपहरण करून त्यांची हत्या केली होती. २०१७ मध्ये ते मामाच्या मुलीच्या विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडला होता.
अलाहाबादेत पेरूचे ९० टक्के पीक नष्ट
अलाहाबाद : जिल्ह्यातील पेरूचे ९० टक्के पीक नष्ट झाले असून, यावर्षी हे विशिष्ट पेरू बाजारातून गायब होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षेही उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा पिवळ्या माशीने हे नुकसान केले आहे. अलाहाबाद व कौशंबी जिल्ह्यात ३,००० हेक्टरवर पेरू लावले जातात.
नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू
चेन्नई : निवार चक्रीवादळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम तामिळनाडू सरकारच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. २६ नोव्हेंबर रोजी तामिळनाडू व पुडुचेरीच्या किनाऱ्यावर धडकलेल्या वादळाने १८ जिल्ह्यांत मोठे नुकसान केले होते.