शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीचा सचिव चतुर्भुज

By admin | Updated: September 4, 2015 00:38 IST

उस्मानाबाद : पाटोदा येथील शेतकऱ्याला विकास सेवा सोसायटीचे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी ३०० रूपयांची लाच स्विकारणाऱ्या सचिवाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने

उस्मानाबाद : पाटोदा येथील शेतकऱ्याला विकास सेवा सोसायटीचे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी ३०० रूपयांची लाच स्विकारणाऱ्या सचिवाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई गुरूवारी दुपारी उस्मानाबाद शहरातील जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात करण्यात आली़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे तक्रारदार हे मागील तीन वर्षापासून सभासद आहेत़ तक्रारदार यांना चालू वर्षी स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या तुळजापूर शाखेतून पीककर्ज काढायचे होते़ त्यामुळे त्यांनी ३० आॅगस्ट रोजी पाटोदा सोसायटीच्या चेअरमन यांच्याकडे जावून पीककर्जासाठी बेबाकी प्रमाणपत्राची गरज आहे़ ते देण्याची मागणी केली़ चेअरमन यांनी बेबाकी प्रमाणपत्र भरून त्यावर स्वत:ची सही व शिक्का मारून सचिव सचिव राजेंद्र जगन्नाथ पवार (वय-३७) यांची सही घेण्यास सांगितले़ तक्रारदाराने ३१ आॅगस्ट रोजी सचिव पवार यांना बेबाकी प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी फोन लावला होता़ त्यावेळी पवार यांनी मी जागजी येथे येण्यास सांगितले़ तक्रारदार यांनी जागजीला येणे शक्य नसल्याचे सांगितले होते़ त्यानंतर पवार यांना २ सप्टेंबर रोजी तक्रारदाराने बेबाकी प्रमाणपत्रासाठी फोन केला त्यावेळी पवार यांनी ‘मी उद्या उस्मानाबाद येथे येणार आहे, तू पण उस्मानाबादला ये, स्टॅन्डवर भेटू’ असे सांगितले़ तक्रारदार यांनी ३ सप्टेंबर रोजी पवार यांची उस्मानाबाद बसस्थानकात भेट घेतली़ तक्रारदार यांच्याकडील बेबाकी प्रमाणपत्र त्यांनी घेतले़ त्यावर गट सचिव असे छापील अक्षर असलेल्या ठिकाणी वरच्या बाजूस सही केली व सदरचे बेबाकी प्रमाणपत्र स्वत:कडे ठेवून तक्रारदार यांना ‘३०० रूपये दे व प्रमाणपत्र घेवून जा’ असे सांगितले़ त्यानंतर तक्रारदाराने थेट एसीबीचे कार्यालय गाठून तक्रार दिली़ एसीबीचे उपाधीक्षक डॉ़ डी़एस़स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक अश्विनी भोसले, पोनि बाळासाहेब आघाव, सपोफौ दिलीप पवार, धनंजय म्हेत्रे आदीच्या पथकाने जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात सापळा रचला़ तक्रारदाराला सोसायटीचे बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी सचिव राजेंद्र जगन्नाथ पवार यांनी ३०० रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ (प्रतिनिधी)