शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

कार्यकर्त्यांना अन्नधान्य वाटपासाठी परवानगी नाही; गल्लीत गप्पा मारणारांवरही होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 7:37 PM

शहरातील कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी ९ दिवसांचा लॉकडाऊन अत्यंत महत्त्वाचा आहे.

ठळक मुद्दे परवानगी घेऊन बाहेरगावाहून शहरात येणाऱ्यास प्रवेश दिला जाईल. गुन्हे नोंदविणार, दंडात्मक कारवाईसुद्धा

औरंगाबाद : दि.१० ते १८ जुलैदरम्यान अन्नधान्य वाटप करणाऱ्यांना पास दिले जाणार नाहीत, असे स्पष्ट करीत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी संचारबंदी अत्यंत कडक असल्याचे नमूद केले.

शहरातील कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी ९ दिवसांचा लॉकडाऊन अत्यंत महत्त्वाचा आहे. अत्यावश्यक सेवा आणि खूपच महत्त्वाचे अथवा वैद्यकीय कारणास्तव घराबाहेर पडणे आवश्यक असेल ती व्यक्ती सोडली तर कुणालाही घराबाहेर पडण्यास परवानगी नसेल. परवानगी घेऊन बाहेरगावाहून शहरात येणाऱ्यास प्रवेश दिला जाईल. 

मात्र, अपवादात्मक  परिस्थिती वगळता कोणालाही शहराबाहेर जाण्यास ई-पास दिला जाणार नाही. गत लॉकडाऊन कालावधीत अन्नधान्य कीट, जेवणाचे डबे  वाटप करण्यासाठी दानशूरांना परवानगी देण्यात आली होती. गरजूंना डबे न देता गुरुवारी एक दिवसात गहू, तांदूळ, आटा , खाद्यतेल असे रेशन वाटप करावे. १० ते १८ दरम्यान अन्नवाटप करण्यासाठी कुणालाही परवानगी मिळणार नाही.  नागरिकांनी या कालावधीत घराबाहेर पडू नये, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. 

अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, औषधी दुकानदार आणि पासधारक प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनाच लॉकडाऊन काळात कामानिमित्त घराबाहेर पडता येईल. शहर पोलीस दलातील सुमारे ८० टक्के जवान रस्त्यावर असतील, असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे उपस्थित होते.

गुन्हे नोंदविणार, दंडात्मक कारवाईसुद्धाशहरातील नागरिकांनी ९ दिवस घराबाहेर पडणे टाळावे. विनाकारण दुचाकी घेऊन घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आणि साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलमानुसार गुन्हे दाखल केले जातील आणि दंडात्मक कारवाई होईल. 

गल्लीत गप्पा मारणारांवरही कारवाईलॉकडाऊन काळात रस्ते सुनसान असतात. मात्र, गल्लीत टोळके गप्पा मारत बसतात. ही बाब लक्षात घेऊन गल्लीबोळांत गप्पा मारणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाईल. प्रथम त्यांचे समुपदेशन केले जाईल.नंतर प्रसंगी गुन्हे नोंदविण्यात येतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद