शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक परिवर्तनाचे काम साहित्यातून

By admin | Updated: February 2, 2015 01:14 IST

केज : सामाजिक परिवर्तनाच्या कामात साहित्य संमेलनांचे मोठे योगदान आहे. अशा संमेलनांची गरज असल्याच प्रतिपदान आ. आर. टी. देशमुख यांनी केले

केज : सामाजिक परिवर्तनाच्या कामात साहित्य संमेलनांचे मोठे योगदान आहे. अशा संमेलनांची गरज असल्याच प्रतिपदान आ. आर. टी. देशमुख यांनी केले. रविवारी मराठवाडा साहित्य परिषद व छत्रपती शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित चौथ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.येथील वसंत महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्व. गोपीनाथ मुुंडे नगरीत हे संमेलन होत आहे. प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे अध्यक्षस्थानी होते. आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, इतिहासतज्ज्ञ डॉ. सतीश साळुंके, राम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.आ. देशमुख म्हणाले, साहित्यातून अन्याय-अत्याचाराविरुद्ध पेटून उठण्याचे बळ मिळते. अशा संमेलनातून ग्रामीण लेखक, कवींना वाव मिळण्यास मदत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. राजपंखे म्हणाले, संमेलनातून समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब उमटते. मसापच्या पुढाकारातून पार पडत असलेल्या या संमेलनाने परिवर्तनाचा जागर होत आहे. शब्दांच्या अविष्काराची ही मैफिल नवोदितांसाठी प्रेरणादायी आहे, असे ते म्हणाले. ‘घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना पुन्हा जाळले पाहिजे’ ही गजल त्यांनी सादर केली. त्याला उपस्थितांनी दाद दिली.आ. संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, डॉ. साळुंके यांची भाषणे झाली.दरम्यान, दिवसभर संमेलनात विविध कार्यक्रम पार पडले. संमेलन स्थळी पुस्तकांचे स्टॉल लागले होते. दुपारच्या सुटीमध्ये व सकाळी येथे गर्दी झाली होती. (वार्ताहर)संमेलनापूर्वी सकाळी आठ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. मुख्य रस्त्यावरुन दिंंडी वसंत महाविद्यालयात पोहोचली. यावेळी भजनी मंडळ, कलशधारी मुली, विविध वेशभूषेतील विद्यार्थी सहभागी होते. त्यांनी केजकरांचे लक्ष वेधले. व्यंकटराव राऊत, समाधान शर्मा, श्रीराम जोशी, रघूनाथ चौरे, प्राचार्य डॉ. गौतम पाटील, लक्ष्मण डोईफोडे यांची उपस्थिती होती.