एवढं बिल, रुग्णाला अमृत पाजले का? आमदार बांगर एमजीएमच्या डॉक्टरवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 07:28 IST2025-04-12T07:27:44+5:302025-04-12T07:28:21+5:30

Santosh Bangar: डेंग्यूने ग्रस्त एका अल्पवयीन मुलीच्या दहा दिवसांच्या उपचाराचे तब्बल सहा लाख रुपये बिल कुटुंबाच्या हाती टेकविण्यात आले. ही बाब कळताच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हस्तक्षेप करीत धर्मादाय असलेल्या एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरला सुनावले.

So much bill, did the patient get nectar? MLA Bangar gets angry at MGM doctor | एवढं बिल, रुग्णाला अमृत पाजले का? आमदार बांगर एमजीएमच्या डॉक्टरवर भडकले

एवढं बिल, रुग्णाला अमृत पाजले का? आमदार बांगर एमजीएमच्या डॉक्टरवर भडकले

छत्रपती संभाजीनगर - डेंग्यूने ग्रस्त एका अल्पवयीन मुलीच्या दहा दिवसांच्या उपचाराचे तब्बल सहा लाख रुपये बिल कुटुंबाच्या हाती टेकविण्यात आले. ही बाब कळताच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हस्तक्षेप करीत धर्मादाय असलेल्या एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरला सुनावले. बांगर आणि डॉक्टर यांच्यातील कॉलवरील हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  आदिती नामक मुलीला डेंग्यू झाला होता. प्रकृती गंभीर झाल्याने तिला एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. 

पिळवणूक थांबवा
आमदार बांगर यांनी 'एवढे बिल कसे झाले? रुग्णाला अमृत पाजलं का ?' अशा शब्दात फटकारले. रुग्ण बरा झाला, पण गरिबांना लुटणे होत नाही. पिळवणूक थांबवा, असे सांगत गरज पडल्यास कारवाई करू, अशा शब्दांत फटकारले. त्यानंतर रुग्णालयाने उर्वरित रक्कम माफ करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: So much bill, did the patient get nectar? MLA Bangar gets angry at MGM doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.