शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

हळदीवर मंदीचे सावट

By admin | Updated: May 22, 2014 00:31 IST

नांदेड :नांदेड : गत दीड महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर मंदीचे सावट आले आहे.

 नांदेड :नांदेड : गत दीड महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत नवा मोंढा बाजारात हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर मंदीचे सावट आले आहे. सुरुवातीला एप्रिल महिन्यात हळदीला सर्वोच्च ८७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. त्यानंतर मात्र मोठ्या संख्येने हळद विक्रीसाठी बाजारात आली आहे. परिणामी खरेदी करणार्‍यांची संख्या कमी झाली असून बाजारात पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे खरेदीदारानेही बाजाराकडे पाठ फिरविली आहे. अवकाळी पावसाने काढणीला व्यत्यय आणल्यामुळे बहुसंख्य शेतकर्‍यांना हळद विक्रीसाठी विलंब झाला. एकाचवेळी आवक वाढली असून दिवसभरात जवळपास १५०० ते २ हजार क्विंटलचा व्यवहार होत आहे. याचा परिणाम चांगल्या दर्जाच्या हळदीलाही मंदीचा फटका बसला असून व्यापार्‍याकडून मागणी कमी झाली आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने हळद तग धरुन राहिली. अतिवृष्टीमुळे बहुतांश भागातील उत्पादनात घट झाली. मात्र सर्व शेतकर्‍यांनी एकाच वेळी विक्रीसाठी हळद बाजारात आणल्याने व्यापार्‍यांना खरेदीदारांची मनधरनी करावी लागत आहे. एका आडत दुकानावर बीट येण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागत आहेत. तर विक्री केलेल्या हळदीचे पैसेही येण्यासाठी पंधरा ते वीस दिवसाचा विलंब लागत आहे. यामुळे खरीपाचा हंगाम जवळ येवून ठेपल्याने शेतकर्‍यापुढे अडचण निर्माण होत आहे.बाजारात खरेदीदारांची संख्या कमी असल्याने खरेदीदार तरी किती शेतमालाची खरेदी करणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. बाहेर जिल्ह्यातून खरेदीदारांची व्यवस्था केल्यास शेतकर्‍यांची समस्या सुटण्यास मदत होईल़(प्रतिनिधी) आॅनलाईन बाजारभाव कमी होत असून बाजारात पैशाचा तुटवडा भासत आहे. याशिवाय बाजारात हळदीची आवक जास्त वाढल्यामुळे आॅनलाईन बाजार तुटत आहेत. सध्या जाणवत असलेली मंदी तात्त्पुरती असून जुनच्या नंतर बाजारात तेजी येईल, असे व्यापारी जयप्रकाश लड्डा यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.