शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीत कारभारी होण्यासाठी सहा हजार महिलांची उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:07 IST

दुसऱ्या दिवशीही विलंब : सरपंच पदासाठी निवडणुकीनंतर आरक्षण सोडत असल्याने उमेदवार वाढले औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी ५ ...

दुसऱ्या दिवशीही विलंब : सरपंच पदासाठी निवडणुकीनंतर आरक्षण सोडत असल्याने उमेदवार वाढले

औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी ५ जानेवारीपासून खऱ्या अर्थाने सुरू झाली. उमेदवारी मागे घेणे, निवडणूक प्रचार चिन्ह मिळाल्यानंतर सर्व पॅनेल आणि उमेदवारांनी दणकावून प्रचाराला लागण्याचे नियोजन केले आहे. सरपंच पदासाठी निवडणुकीनंतर आरक्षण सोडत असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींत सुमारे सहा हजार महिला उमेदवार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

४ जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत निवडणूक चिन्ह मिळण्यावरून इच्छुक उमेदवार आणि पॅनेलमध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी रिंगणात आणि माघार घेतलेल्या उमेदवारांची गोळाबेरीज करताना दमछाक झाली. ५ जानेवारी रोजी सायंकाळपर्यंत आकड्यांची जुळवाजुळव सुरू होती.

किती ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या, याची माहिती

निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायती किती

६१७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत.

एकूण प्रभाग

२०९० प्रभाग पूर्ण ग्रामपंचायतींमध्ये

रिंगणात उमेदवार किती

निवडणुक रिंगणात ११ हजार ४९९ उमेदवार आहेत.

मतदान केंद्रांची संख्या

जिल्ह्यात २ हजार ४७ मतदान केंद्र आहेत.

५ हजार ५४८ उमेदवारांची माघार

जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींच्या २ हजार ९० प्रभागांतील ५ हजार ६८३ सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतून तब्बल १६ हजार ९५७ जणांनी अर्ज दाखल केले होते. ५ हजार ५४८ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. वैजापूर तालुक्यात १६३०, सिल्लोडमध्ये १५०९, कन्नड १५१२, पैठण १७३२, औरंगाबाद १४४५, तर गंगापूर तालुक्यात १४४८ उमेदवार रिंगणात आहेत.

जिल्ह्यातील लक्षवेधी ग्रामपंचायती

जिल्ह्यात लक्षवेधी असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये पैठण, वैजापूर, सिल्लोड आणि औरंगाबाद तालुक्यात लक्षवेधी निवडणुका होणार आहेत. औरंगाबाद, पैठण तालुक्यातील औद्योगिक वसाहतींच्या हद्दीतील ग्रामपंचायत निवडणुकींकडे सर्वांचे लक्ष आहे. तीसगांव, पंढरपूर या ग्रामपंचायती लक्षवेधी आहेत.

कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायती

वैजापूर १०५, सिल्लोड ८३, कन्नड ८३, पैठण ८०, औरंगाबाद ७७, गंगापूर ७१, फुलंब्री ५३, सोयंगाव ४०, तर खुलताबादमध्ये २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.

निवडणूक प्रक्रिया अधिकाऱ्यांची माहिती अशी

निवडणुक प्रक्रिया अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी सांगितले की, जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान आणि १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.