विचित्र अपघातामध्ये सख्खे भाऊ ठार
By Admin | Updated: November 29, 2014 00:29 IST2014-11-29T00:04:47+5:302014-11-29T00:29:55+5:30
मांडवा : भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीसह दोन सख्खे भाऊ छोट्या टेम्पोवर आदळले़ यात दोघांचाही मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता बीड - परळी राज्य रस्त्यावरील पांगरीनजीक घडली़

विचित्र अपघातामध्ये सख्खे भाऊ ठार
मांडवा : भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीसह दोन सख्खे भाऊ छोट्या टेम्पोवर आदळले़ यात दोघांचाही मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता बीड - परळी राज्य रस्त्यावरील पांगरीनजीक घडली़
भास्कर वसंत हाके (वय २७) दत्तू वसंत हाके (वय ३०, दोघेही रा़ चिंचखंडी, ता़ परळी) अशी मयत भावंडांची नावे आहेत़ ते दोघे ऊसतोड मजूर म्हणून काम करीत होते़ शुक्रवारी सायंकाळी दुचाकीवरून चिंचखंडी येथून पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे जात होते़ समोरून आलेल्या कारने त्यांना जोराची धडक दिली़ या धडकेने हाके बंधू हवेत उडून पाठीमागून येणाऱ्या छोटा टेम्पो (क्ऱएमएच २० / ७५५०) वर आदळले़ अपघातानंतर कारचालक वाहनासह पसार झाला़ घटनेची माहिती मिळताच ग्रामीण व शहर पोलिसांनी धाव घेतली़ (प्रतिनिधी)४
चिंचखंडी हे ऊसतोड मजुरांचे गाव आहे़ हाके बंधू मागील अनेक वर्षांपासून ऊसतोडणीचे काम करीत होते़ एकाच वेळी त्या दोघांना प्राण गमवावे लागल्याने गावावर शोककळा पसरली़