एकच खिडकी, कनेक्टीव्हीटीचीही अडचण; एसबीआयचे ग्राहक त्रस्त

By Admin | Updated: March 23, 2016 00:19 IST2016-03-23T00:16:46+5:302016-03-23T00:19:50+5:30

किनवट : येथील भारतीय स्टेट बँक शाखेत मनुष्यबळ कमी असल्याने दररोज केवळ एकाच खिडकीवर कारभार सुरू असल्याने ही बँक ठेवीदार, ग्राहकांसाठी अलीकडे डोकेदुखीच ठरू पाहत आहे़

Single window, difficulty connectivity; SBI customers suffer | एकच खिडकी, कनेक्टीव्हीटीचीही अडचण; एसबीआयचे ग्राहक त्रस्त

एकच खिडकी, कनेक्टीव्हीटीचीही अडचण; एसबीआयचे ग्राहक त्रस्त

किनवट : येथील भारतीय स्टेट बँक शाखेत मनुष्यबळ कमी असल्याने दररोज केवळ एकाच खिडकीवर कारभार सुरू असल्याने ही बँक ठेवीदार, ग्राहकांसाठी अलीकडे डोकेदुखीच ठरू पाहत आहे़ अधूनमधून इंटरनेटचा प्रश्न निर्माण होवून कनेक्टीव्हीटीअभावी ग्राहकांना याचा मोठा फटका बसतो़ प्रिंटरसुद्धा अधूनमधून बिघडते.
काही वर्षांपूर्वी या बँकेत एकूण आठ कर्मचारी-अधिकारी होते़ आता मात्र ग्राहक जास्त आणि अधिकारी, कर्मचारी कमी असे चित्र आहे. त्यामुळे ग्राहक-ठेवीदार यांना त्याचा फटका बसत आहे़ दैनंदिन वेळात ग्राहकांची मोठी गर्दी असताना केवळ एकाच कॉऊंटरवर भागविले जाते. कर्मचाऱ्याअभावी महिला बचत गटांना कर्जाचा पुरवठा करणे, प्रसुतीचे पैसे मिळणे, एम़एस़सी़आय़टी़चे चॅनल भरणे, रॉयल्टीचे चॅनल, आरटीजीएस, एऩएफ़टी़ करणे अवघड बनले. कॅश स्वीकारणे व देण्यासाठी एकच खिडकी असल्याने बँकेत रांगच दिसून येते़ कर्मचाऱ्यांची वाणवा असतानाच दोन दिवसाला एक कर्मचारी रिमीडस (कॅशसाठी) द्यावा लागतो़ परिणामी बँक कामकाजावर याचा परिणाम होताना दिसत आहे़ बँकेतील प्रिंटर्सही बंदच असते़ त्यामुळे स्टेटमेंट वेळीच मिळत नाही़ गरजवंतांना स्टेटमेंट हवे असल्यास ११४ रुपये भरूनच स्टेटमेंट मिळवावे लागते़ अशा ग्राहकांच्या तक्रारी असून ही बँक स्टेटमेंटसाठी नाहक ११४ रुपये उकळून ग्राहकांची लुट करीत असल्याने ही बँक सेवा देण्यासाठी की नाहक लोकांचे पैसे घेण्यासाठी असा सवाल विचारला जात आहे़ (वार्ताहर)

Web Title: Single window, difficulty connectivity; SBI customers suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.