सिल्लोड: तालुक्यातील पिपळगावपेठ येथील गणेशवाडी शिवारात दारूच्या व्यसनापायी एका पतीने स्वतःचेच घर आणि शेतातील मक्याची गंजी जाळून खाक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने दारू पिण्यास पैसे दिले नाहीत, या रागाच्या भरात पतीने हे निष्ठुर कृत्य केले असून यामध्ये कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे.
नेमकी घटना काय?मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आरोपी सुदाम शामराव दुधे याने पत्नी पार्वताबाई यांच्याकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच सुदामने पत्नीला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याने रागाच्या भरात घराला आग लावली. त्यानंतर शेतात असलेली जवळपास १०० क्विंटल मक्याची गंजीही पेटवून दिली.
लाखोंचे नुकसानया आगीत घरातील अंथरुणे, संसारोपयोगी साहित्य, धान्य आणि शेतमाल जळून खाक झाला असून कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पतीच्या या कृत्यामुळे संतप्त झालेल्या पार्वताबाई यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी बुधवारी रात्री आरोपी पती सुदाम दुधे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : In Sillod, a man burned his house and grain after his wife refused to give him money for alcohol. He assaulted her and set fire to their home and 100 quintals of corn, leaving the family destitute. Police have registered a case and investigation is underway.
Web Summary : सिल्लोड में, एक आदमी ने शराब के लिए पत्नी द्वारा पैसे देने से इनकार करने पर अपना घर और अनाज जला दिया। उसने पत्नी पर हमला किया और उनके घर और 100 क्विंटल मक्का में आग लगा दी, जिससे परिवार बेसहारा हो गया। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है और जांच जारी है।