शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

बाळंत महिलांना बुडीत मजुरी

By admin | Updated: July 16, 2017 00:35 IST

नांदेड : रोजंदरीने जाणाऱ्या महिलांना बाळंतपणात काम करण्याची गरज पडू नये, म्हणून मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत दोन महिन्यांची बुडीत मजुरी दिली जाते़

श्रीनिवास भोसले । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : रोजंदरीने जाणाऱ्या महिलांना बाळंतपणात काम करण्याची गरज पडू नये, म्हणून मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत दोन महिन्यांची बुडीत मजुरी दिली जाते़ या योजनेतून मागील वर्षात जिल्ह्यातील एकूण ६ हजार ६१० बाळंत महिलांना प्रत्येकी ४ हजार रूपये याप्रमाणे २ कोटी १६ लाख २६ हजार रूपये बुडीत मजुरीपोटी देण्यात आले आहेत़ या रकमेतून दैनंदिन खर्च भागत असल्याने गरोदर महिलेला मजुरी करण्याची गरज भासत नाही़ मानव विकास निर्देशांकानुसार निवड झालेल्या तालुक्यात मानव विकास कार्यक्रमांअतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात़ यामध्ये गरजू आणि वंचितांना अधिकाधिक लाभ मिळेल, अशाप्रकारचे नियोजन केले जाते़ ग्रामीण व शहरी भागातील हातावर पोट असणाऱ्या अनेक महिलांना परिस्थितीमुळे गरोदर असताना आणि बाळंत झाल्यानंतरही मजुरीवर जावे लागते़ घरातील खर्च आणि कमावत्या व्यक्तीची संख्या कमी असल्याने बऱ्याच महिला गरोदर आणि बाळंत काळात कामावर जातात़ त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात़ तर नवव्या महिन्यात मेहनतीचे आणि जोखमीची कामे केल्यामुळे बहुतांश महिलांचा गर्भपातदेखील झाल्याची उदाहरणे आहेत़ त्यांना अशा परिस्थितीला सामोरे जाण्यापासून रोखता यावे म्हणून सदर योजनेच्या माध्यमातून बुडीत मजुरी दिली जाते़ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील बाळंत महिलांना या योजनेचा लाभ मिळतो़ पात्र लाभार्थ्यांची यादी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मागविण्यात येते़ त्यांना नवव्या महिन्यात दोन हजार रूपये आणि बाळंत झाल्यानंतर दोन हजार रूपये असे एकूण चार हजार रूपये दिले जातात़ ही रक्कम थेट लाभार्थ्यांचा खात्यावर जमा केल्याने त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळतो़ यातून त्या महिलेचे औषधोपचार व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लागतो़ मानव विकास योजनेत असलेल्या लोहा तालुक्यात ५ प्राथमिक आरोग्य केंद्र, देगलूर-३, बिलोली-५, धर्माबाद - १, उमरी-१, मुदखेड-२, भोकर-३, हिमायतनगर-२ आणि किनवट तालुक्यात ९ असे एकूण ३१ आरोग्य केंद्र समाविष्ट आहेत़ तर लोहा, बिलोली, धर्माबाद, उमरी, मुदखेड, भोकर, किनवट अशा सात केंद्राअंतर्गत सदर योजनेच्या लाभार्थ्यांची निवड केली जाते़ प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये महिन्याला २० लाभार्थी अपेक्षित आहेत़ यानुसार जिल्ह्यात ९ हजार ४७८ लाभार्थी मिळणे अपेक्षित होते़ परंतु, मागील वर्षात केवळ ६ हजार ६१० महिलांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे़