शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पारंपारिक शेतीला फाटा, रोपवाटिका उभारून भावंड कमवतात महिन्याला लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 19:54 IST

परंपरागत शेती करणे परवडत नसल्याने एक वेगळा प्रयोग म्हणून दोघांनी ९ वर्षा पूर्वी रोपवाटिका सुरु केली.

फुलंब्री : तालुक्यातील गेवराई पायगा येथील दोन शेतकरी भावंडानी नवीन प्रयोग करून तीन एकर क्षेत्रात रोपवाटिका उभारली. एका वर्षात एक कोटी रोपे त्यांनी विकली. यातून ते महिन्याकाठी दोन लाख रुपये कमावत आहेत. सोबतच ३० जणांना रोजगार ही या भावडांनी उपलब्ध करून दिला आहे.

गेवराई पायगा येथील शेतकरी गजानन साबळे व श्रीराम साबळे ह्या  दोन भावंडाकडे एकूण आठ एकर शेती आहे. त्यांनी पाच एकर जमिनीवरील दहा गुंठे क्षेत्रात २०१४ मध्ये मिरची, टमाटे, वांगे, कोबी, टरबूज, खरबूज पपई, शेवगा, झेंडू फुले, कारले, दोडके याची रोपवाटिका सुरु केली. २०१९ मध्ये कृषी विभागाकडून शेडनेट मिळाले. यामुळे रोपवाटिकेचा विस्तार झाला. आता प्रत्येक वर्षी एक कोटी रोपे तयार करून ते विक्री करीत आहेत.  यातून महिन्याकाठी दोन ते अडीच लाख रुपये निव्वळ नफा मिळत असल्याचे शेतकरी भावडांनी सांगितले.

३० जणांना रोजगार दिलाया रोपवाटिकेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जातीचे रोप टॅग केले जाते़. रोपे तयार केल्यानंतर वहित जात, तारीख, खते, पाणी यांची नोंद केली जाते़. कोणते रोप किती प्रमाणावर उगवले याची नोंद ते ठेवतात. त्यामुळे शेतकऱ्यांची  फसवणूक होत नाही़. शेतक-यांनी कोणते पीक घेतले म्हणजे फायदेशीर ठरेल याचा अभ्यास करून ते शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन ही करतात. याशिवाय रोपवाटिकामध्ये भाजीपालासह, फळ, फुलांची रोपे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यातून त्यांच्या कुटुबियांबरोबर आणखी ३० जणांना रोजगार मिळाला आहे. 

हायटेक पद्धतीने रोपनिर्मिती सुमारे तीन एकरांवर सध्या त्यांच्याकडे रोपवाटिका आहे  त्यांच्याकडे रोपांची निर्मिती पूर्णपणे ट्रेमध्ये केली जाते.ट्रे भरण्यासाठी कोकोपीट चा वापर केला जातो ,ट्रेमध्ये बी भरण्यासाठी खास सीडलिंग मशिन आहे.या मशिनद्वारे बियाणे  ट्रेम मध्ये भरली जाते मशीन मुळे बियाणे सारख्या खोल अनंतराव टोकन होते त्यामुळे सर्व रोपे ही एकसमान तयार होतात. ट्रे खाली विशिष्ठ अशी मॅट असल्याने रोपांचे बुरशीजन्य रोगांसह अन्य कीड- रोगांपासूनही संरक्षण होते. या रोपवाटिका मधून मिळणारे विविध भाजीपाल्याचे रोपे जालना, औरंगाबाद  या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी शेतात येऊन खरेदी करीत आहेत दररोज शेड नेट ठिकाणी शेतकऱ्यांना आपली वाहाने घेऊन येतात नामांकित बियाणे कंपनीचे रोपे असल्याने यात फारसे नुकसान होत नाही 

महिन्याकाठी दोन लाख मिळतात रोपवाटिका मध्ये भाजीपाला पिकाची रोपे असल्याने हि रोपे बागायती शेतकऱ्यांना आवश्यक असतात म्हणून वर्षाला किमान एक कोटी रोपे येथून विकली जातात एक रोपाची किमत एक रुपया २५ पैसे प्रमाणे असते. एका वर्षाला एक कोटी रोपे विकली जातात यातून मिळणारी सव्वा कोटी रुपयातून ८० टक्के रक्कम बियाणे, ट्रें खरेदी, खते, औषधी, नारळपीठ, मजुरी यांना जाते उर्वरित २० टक्के रक्कम निव्वळ नफा राहतो. एक वर्षाला २५ लाख रुपये मिळतात.

वेगळा प्रयोग म्हणून केली सुरुवात परंपरागत शेती करणे परवडत नसल्याने एक वेगळा प्रयोग म्हणून आम्ही दोघांनी ९ वर्षा पूर्वी रोपवाटिका सुरु केली. सुरुवातीला जेमतेम विक्री होत होती. शेडनेट नव्हते. २०१९ नंतर रोपवाटिकाचा विस्तार झाला. मागील दोन वर्षांपासून प्रत्येक वर्षी एक कोटी पर्यंत रोपे विकली जातात. यापासून आर्थिक फायदा होत आहे अशी माहिती शेतकरी बंधू गजानन आणि श्रीराम साबळे यांनी दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद