शुभम वाघुलेचा खून नरबळीसाठी?
By Admin | Updated: May 14, 2016 00:13 IST2016-05-14T00:04:11+5:302016-05-14T00:13:39+5:30
औरंगाबाद : जयभीमनगर येथे अतिशय क्रूर पद्धतीने एका मित्राने शुभम अनिल वाघुले (२२, रा. लहुजीनगर, हर्सूल) याचा ५ मे रोजी खून केला होता.

शुभम वाघुलेचा खून नरबळीसाठी?
औरंगाबाद : जयभीमनगर येथे अतिशय क्रूर पद्धतीने एका मित्राने शुभम अनिल वाघुले (२२, रा. लहुजीनगर, हर्सूल) याचा ५ मे रोजी खून केला होता. हा खून समलैंगिक संबंधातून झालेला नसून पोलीस त्याला वेगळे वळण लावत असल्याचा आरोप करून हा नरबळीचा प्रकार असून तपास सीआयडीकडे देण्याची मागणी वाघुले कुटुंबियांनी आयुक्तांकडे केली. त्यावरून परिमंडळ एकच्या उपायुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
जयभीमनगरात ५ मे रोजी गुरुवारी एका मुलाने शुभमचा नसा कापून निर्घृण खून केला होता. २४ तासांच्या आत बेगमपुरा पोलिसांनी त्या मुलाला अंबडला जाऊन ताब्यात घेतले होते. त्याने समलैंगिक संबंधातून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटना घडली त्या दिवशी अमावास्या होती. त्याच दिवशी आरोपीची बहीण व मेहुणा कंदुरीच्या कार्यक्रमाला गेले होते. तिकडे कंदुरीचा कार्यक्रम आणि इकडे शुभमचा क्रूर पद्धतीने करण्यात आलेला खून हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला.
बीअर पिल्याची कबुली- पोलीस सूत्र
पंचनामा करताना बेगमपुरा पोलिसांना घटनास्थळी बीअरच्या बाटल्या सापडल्या नसल्या तरी त्या मुलाने खून करण्यापूर्वी बीअर पिल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती बेगमपुरा ठाण्यातील सूत्रांनी दिली. दरम्यान, त्या मुलाचा ताबा पोलिसांनी मागितला होता; परंतु न्यायालयाने त्याला सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.