दुकान मालकाची ग्राहकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 20:48 IST2019-05-02T20:48:31+5:302019-05-02T20:48:57+5:30

दोन महिन्यांपूर्वी खरेदी केलेले टायर खराब निघाल्याने ते बदलून देण्याची मागणी ग्राहकाने केली. त्यानंतर ग्राहकाला दुकान मालक व त्याच्या साथीदाराने जबर मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

 Shop owner's assault to the customer | दुकान मालकाची ग्राहकाला मारहाण

दुकान मालकाची ग्राहकाला मारहाण

वाळूज महानगर : दोन महिन्यांपूर्वी खरेदी केलेले टायर खराब निघाल्याने ते बदलून देण्याची मागणी ग्राहकाने केली. त्यानंतर ग्राहकाला दुकान मालक व त्याच्या साथीदाराने जबर मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी पंढरपूर येथे घडली.


बद्रिनाथ विश्वनाथ बनकर यांनी दोन महिन्यांपूर्वी पंढरपुरातील गणेश टायर्स दुकानातून दुकान मालक साकला याच्याकडून टायर खरेदी केले. दोन महिन्यांत टायर खराब झाल्याने बनकर यांनी दुकान मालक साकला याच्याकडे संबंधित टायर बदलून देण्याची मागणी केली. यातून त्यांच्यात वाद झाला.

त्यामुळे साकला याने साथीरादासह बनकर यास बेदम मारहाण केली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुकान मालक साकला, डॉ. छल्लानी, राजू शेख व अन्य एकजण अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Shop owner's assault to the customer