शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

धक्कादायक ! नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 7:18 PM

नापिकीमुळे शेतीत काहीच उत्पन्न निघत नव्हते. त्यामुळे त्या चिंतेत होत्या.

ठळक मुद्दे मराठवाड्यात या वर्षातील ही अशी पहिलीच घटना दोन एकर शेतीसाठी महिला बचत गटाकडून सव्वालाखाचे कर्ज घेतले

कायगाव (जि. औरंगाबाद) : गंगापूर तालुक्यातील पखोरा येथील एका शेतकरी महिलेने कर्जाला कंटाळून सोमवारी रात्री बारा वाजता आत्महत्या केली. संगीताबाई काशीनाथ पाठे (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. पुरुष शेतकरी आत्महत्यांची संख्या मराठवाड्यात दिवसेंदिवस वाढत असतानाच आता महिला शेतकरीही मृत्यूस कवटाळत आहेत.  मराठवाड्यात या वर्षातील ही अशी पहिलीच घटना असून यामुळे खळबळ उडाली आहे. 

या घटनेची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना फोन करून दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविला. मंडळ अधिकारी सोनवणे यांनी पंचनामा केला. संगीताबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जमादार गणेश काथार, सीमंत वाघमारे पुढील तपास करीत आहेत. 

याबाबत पखोरा गावचे माजी सरपंच भाऊसाहेब पदार म्हणाले की, संगीताबार्इंचे आपल्या कुटुंबियांवर मोठे प्रेम होते. शेतीकामासाठी घेतलेले कर्ज आपण फेडू, तुम्ही त्रास करून घेऊ नका, असे सांगून त्या नेहमी पतीला धीर देत. कर्ज फेडण्यासाठी वाटल्यास अर्धा एकर जमीन विकू, असेही त्या म्हणत. मात्र काही तरी मार्ग काढू, जमीन विकणे योग्य नाही, अशी पतीकडून समजूत काढली जायची. मयत संगीताबार्इंचा स्वभाव खूप चांगला होता. त्यांचा घरात आणि घराबाहेर कधीच कुणाबरोबर वाद नसायचा. पण कर्जफेड कशी करायची, यासाठी त्या नेहमी चिंतित असत. संपूर्ण गावाला त्यांच्या या समस्येची माहिती होती, अशी माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम पदार यांनी दिली.  

दोन एकर शेतीदोन एकर शेतीसाठी संगीताबार्इंनी चार वर्षांपूर्वी महिला बचत गटाकडून सव्वालाखाचे कर्ज घेतले होते. परंतु शेतात उत्पन्न न आल्याने त्या कर्जबाजारीपणाला कंटाळल्या होत्या. बचत गटाच्या महिला आणि ज्या वित्त संस्थेने बचत गटामार्फत कर्ज दिले होते, त्यांचे अधिकारी नेहमी कर्जाचे हप्ते भरावे, यासाठी घरी येऊन तगादा लावत होते. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, ही मोठी विवंचना होती. शेती कोरडवाहू असल्याने त्यात मागील पाच वर्षांत काहीच उत्पन्न आले नव्हते. त्यामुळे संगीताबार्इंनी हा मार्ग पत्करला. संगीताबार्इंच्या दोन मुलांपैकी एक सतरा वर्षीय मुलगा दहावीला आणि दुसरा सात वर्षांचा मुलगा इयत्ता दुसरीत शिकतो. 

महिला-पुरुष अशी वर्गवारी नाहीशेतकरी आत्महत्येची महिला-पुरूष अशी वर्गवारी केली जात नाही. कायगांव येथील प्रकरणाची माहिती घ्यावी लागेल. असे महसूल उपायुक्त डॉ.विजयकुमार फड यांनी सांगितले. 

३१३ आत्महत्यामराठवाड्यात १ जानेवारी ते २८ मेपर्यंत ३१३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २११ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरले असून, ६७ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. ३५ प्रकरणांची चौकशी सुरू आहे. १ कोटी ४४ लाख रुपयांची शासकीय मदत करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये ३९, जालना ४५, परभणी २५, हिंगोली १८, नांदेड ३५, बीड ६९, लातूर ३३, उस्मानाबाद ४९ अशा ३१३ आत्महत्या झाल्या आहेत. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याdroughtदुष्काळAurangabadऔरंगाबाद