धक्कादायक ! भावासोबतच्या वादातून वकीलाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 14:18 IST2020-04-28T14:08:53+5:302020-04-28T14:18:33+5:30
शहरातील दिवाणदेवडी येथील घटना

धक्कादायक ! भावासोबतच्या वादातून वकीलाची गळफास घेऊन आत्महत्या
औरंगाबाद : सिडको एन १ येथील रहिवासी वकिल तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना दिवाणदेवडी येथे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आली. दरम्यान, घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळून आली असून भावासोबतच्या वादातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
मयूर राजेश भट (वय ३१)असे मयताचे नाव आहे . याविषयी प्राप्त माहिती अशी की मयूर हा आई- वडील , मोठा भाउ आणि भावजाई सह सिडको एन १ येथे राहतो . त्यांचे दिवाण देवडी येथे जुने घर आहे .तेथे मयूरचे काका राहतात . लॉकडाउन सुरू झाला तेव्हापासून मयूर दिवाणदेवडी येथे राहात होता . सोमवारी दुपारी तो वाळूज येथे राहणाऱ्या काकाच्या घरी जाउन आला .
आज सकाळी नळाला पाणी येणार असल्याने पाणी भरण्यासाठी मयूर ने झोपेतून उठावे याकरिता त्यांच्या नातेवाईकानी त्याला मोबाईलवर कॉल केला मात्र त्याचा फोन बंद होता . आज सकाळी त्याचे नातेवाईक दिवाणदेवडी येथील घरी गेले असता मयूर ने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली .पोलीस निरीक्षक संभाजी पवार आणि कर्मचारी यांनी घटनास्थळाला भेट देवून पहाणी केली . नंतर पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला.