धक्कादायक ! लासुर ते पोटूळ दरम्यान रेल्वे रुळाला तडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 10:44 IST2019-01-30T10:40:44+5:302019-01-30T10:44:42+5:30

थंडीमुळे हा प्रकार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Shocking The rail track have crack between Lasur to Portula | धक्कादायक ! लासुर ते पोटूळ दरम्यान रेल्वे रुळाला तडा

धक्कादायक ! लासुर ते पोटूळ दरम्यान रेल्वे रुळाला तडा

औरंगाबाद : लासुर ते पोटूळ दरम्यान रेल्वे रुळाचे वेल्डिंग निघाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला.

रेल्वे मार्गात दोन रूळ जोडण्यासाठी वेल्डिंग केली जाते लासुर ते  पोटूळ यादरम्यान रेल्वे रुळाचे वेल्डिंग निघून गेल्याचा प्रकार घडला. आज सकाळी जनशताब्दी एक्सप्रेसच्या गार्डला हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तातडीने ही माहिती नांदेड विभागाच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली औरंगाबाद रेल्वे स्टेशनला ही या संदर्भात माहिती देण्यात आली.

या प्रकारामुळे या मार्गावरून सकाळच्या वेळीतील रेल्वे धीम्यागतीने चालवण्यात आल्या थंडीमुळे हा प्रकार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रेल्वे रुळाच्या जोडवर क्लिप लावलेली असल्याने हा प्रकार धोकादायक नाही असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला .या रुळाची दुरुस्ती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Shocking The rail track have crack between Lasur to Portula