धक्कादायक ! पूर्व वैमनस्यातून माथेफिरू तरुणाने चौघांना भोसकले; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 13:31 IST2021-03-10T13:27:11+5:302021-03-10T13:31:18+5:30
Crime News शहरातील अंगुरीबाग परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास नितीन उर्फ गब्या खंडागळे या तरुणाने हल्ला केला

धक्कादायक ! पूर्व वैमनस्यातून माथेफिरू तरुणाने चौघांना भोसकले; एक ठार
औरंगाबाद: पूर्व वैमनस्यातून माथेफिरू तरुणाने बेसावध असेलेल्या तीन जणांवर अचानक चाकूने हल्ला करत भोसकण्यास सुरवात केली. यावेळी त्याला पकडण्यासाठी धावलेल्या तरुणावरही त्याने चाकूने पाच ते सहा वार केल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी रात्री १२:१५ वाजता अंगुरीबागेतील पाखरे निवास समोर झाली.
दानिश शफियोद्दीन सय्यद (२१,रा . अंगुरीबाग ) असे मयताचे नाव आहे. या घटनेत सय्यद सलीम सय्यद खलील (२५), शेख जब्बार मोहम्मद खान (२७) आणि फैय्याज नासेर खान उर्फ बाबा खान हे जखमी झाले. जखमी तीन तरुणांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
शहरातील अंगुरीबाग परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास नितीन उर्फ गब्या खंडागळे या तरुणाने सय्यद सलीम सय्यद खलील, शेख जब्बार मोहम्मद खान आणि फैय्याज नासेर खान उर्फ बाबा खान या तिघांवर हल्ला केला. यावेळी त्याला पकडण्यासाठी धावलेल्या दानिश शफियोद्दीन सय्यद या तरुणावरही नितीनने चाकू हल्ला करत चार ते पाच वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झलक. या प्रकरणी औरंगाबादमधील क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी हल्लेखोर नितीन गब्या खंडागळेला बेड्या ठोकल्या आहेत.