शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

धक्कादायक! चोवीत तासांत छत्रपती संभाजीनगरात चार जणांनी संपवले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 17:25 IST

शेतकरी, वाहनचालक, प्लंबरसह न्यायालयाच्या लिपिकाने उचलले टोकाचे पाऊल

छत्रपती संभाजीनगर : गेल्या चोवीस तासांत शहरात ४ जणांनी आत्महत्या करत आयुष्य संपवले. देवळाई, सातारा, जहांगीर कॉलनीसह गोलवाडी परिसरात या घटना उघडकीस आल्या. चारही घटनांत आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी वैयक्तिक, आर्थिक तसेच कौटुंबिक तणावातूनच चौघांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मुलांना अभ्यास करण्यासाठी सांगून खोलीत गेलेसाताऱ्यातील रोहिदासनगरात राहणाऱ्या रवींद्र बारकू कापडणीस (५०) यांनी गळफास घेतला. रवींद्र जिल्हा व सत्र न्यायालयात लिपिक होते. सोमवारी सायंकाळी न्यायालयातून घरी परतल्यानंतर त्यांनी कुटुंबासोबत जेवण केले. मुलांना ‘अभ्यास करा, मी खोलीत झाेपतो,’ असे सांगून ते त्यांच्या बेडरूममध्ये गेले. मंगळवारी सकाळी नेहमीची वेळ उलटल्यानंतरही रवींद्र उठले नसल्याने पत्नीने खिडकीतून पाहिले असता ते लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. सातारा पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार रज्जाक शेख अधिक तपास करीत आहेत.

भावाला शेवटचा कॉल करून आत्महत्यामोठ्या भावाला शेवटचा काॅल करून तय्यब समद पठाण (२४) यांनी गळफास घेतला. खासगी वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारे तय्यब काही दिवसांपासून जहांगीर कॉलनीत पत्नीसोबत राहत होते. त्याच भागात तय्यब यांचे सासरचे कुटुंबदेखील राहत होते. सोमवारी रात्री १० वाजता त्यांनी भावाला तणावातच शेवटचा कॉल करून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. भाऊ त्यांच्या घरी पोहोचेपर्यंत ते लटकलेल्या अवस्थेत आढळले. हर्सूल पोलिस अधिक तपास करीत आहेत.

कामावर जातो सांगून शेतात गळफासकामावर जात असल्याचे सांगून प्लम्बिंगचे काम करणाऱ्या अमोल काकासाहेब लोखंडे (३३, रा. देवळाई) यांनी बाळापूर शिवारात एका झाडाला गळफास घेतला. मंगळवारी सकाळी ९:३० वाजता ही घटना उघडकीस आली. अमोल मंगळवारी नेहमीप्रमाणे सकाळी काम असल्याचे सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी थेट बाळापूर शिवारातील शेतात जात झाडाला गळफास घेतला. त्यांचे मामा संतोष हिवाळे शेतात गेल्यानंतर त्यांना ही बाब निदर्शनास आली. अमोल यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. चिकलठाणा पोलिस ठाण्याचे अंमलदार निवृत्ती मदने तपास करीत आहेत.

चहा पिऊन क्षणात टोकाचे पाऊलगोलवाडीमध्ये राहणारे ३० वर्षीय शेतकरी तुळजाराम सलामपुरे (३०) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे कुटुंबातील सदस्यांसोबत चहा घेतला. त्यानंतर वरच्या मजल्यावर जात गळफास घेतला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. छावणी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी