शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

धक्कादायक ! वैफल्यग्रस्त गिरणी चालकाची पाण्याच्या ड्रममध्ये आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 2:07 PM

suicide news मागील काही दिवसांपासून गिरणी चालक हे दरवाजा बंद करून दिवस-दिवस घरात बसून राहायचे.

ठळक मुद्देनागरिकांनी ‘त्याला’ ड्रमसह नेले घाटी रुग्णालयातशहरातील बनेवाडी येथील धक्कादायक घटना

औरंगाबाद : वैफल्यग्रस्त पिठाच्या गिरणी चालकाने स्वत:च्या घरात पाण्याने अर्धवट भरलेल्या ड्रममध्ये बसून जीव दिल्याची धक्कादायक घटना बनेवाडी येथे रविवारी दुपारी उघडकीस आली. बाळू भिवसन औचरमल (४०), असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

बनेवाडी येथील बुद्धविहाराजवळ बाळू औचरमल यांचे घर आहे. बाजूच्या खोलीत त्यांची वृद्ध आई राहते, तर जवळच मोठा भाऊ राहतो. बाळू स्वत:ची पिठाची गिरणी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. कधी-कधी ते दुसऱ्याच्या गिरणीतही कामाला जात असे. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी माहेरी गेली असून, त्यांचा मुलगा आजीकडे राहतो. त्याला एक मुलगी असून, तिचे लग्न झालेले आहे. मागील काही दिवसांपासून बाळू हे दरवाजा बंद करून दिवस-दिवस घरात बसून राहायचे. शुक्रवारी दुपारी त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यांच्या आईने दोन दिवस त्यांना आवाज दिला; पण त्यांनी प्रत्युत्तर दिले नाही.

अखेर रविवारी दुपारी विहाराजवळ उभे असलेले नितीन दाभाडे व अन्य तरुणांना बाळू यांच्या वृद्ध आईने दोन दिवसांपासून दरवाजा उघडत नाही, तुम्ही तरी त्याला आवाज द्या, अशी विनवणी केली. तेव्हा त्या तरुणांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला; पण आतून दरवाजाला ड्रम आडवा लावल्यामुळे तो ढकलत नव्हता. शेवटी पत्रे उचकटून पाहिले असता पाण्याने अर्धवट भरलेल्या ड्रममध्ये बसलेल्या अवस्थेत बाळू हे मरण पावल्याचे दिसून आले.ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. या घटनेची माहिती वेदांतनगर पोलिसांना कळविली. नागरिकांनी बाळू औचरमल यांचा मृतदेह ड्रमसह घाटीत नेला. डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी