शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! भीक मागण्यासाठी दीड लाखात दोन चिमुकल्यांना घेतले विकत; मायलेकी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 17:41 IST

Crime News Aurangabad : ५ वर्षांच्या मुलाला ५५ हजारांत आणि जालन्यातील २ वर्षांच्या मुलाला १ लाख रुपयांमध्ये विकत घेतले

ठळक मुद्देमुकुंदवाडी परिसरातील घटना चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद : मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडून विकत घेऊन त्यांना मारहाण करून भीक मागण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या माय-लेकीला मुकुंदवाडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. जनाबाई उत्तम जाधव (५९) आणि सविता संतोष पगारे (३३, दोघी रा. रामनगर, मुकुंदवाडी) अशी आरोपी महिलांची नावे आहेत. ( Bought two children for Rs 1.5 lakh to beg; Mother-Daughter arrested )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयनगर येथील सामाजिक कार्यकर्ते देवराज वीर यांना नातेवाईक महिलेने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता रामनगर येथे आरोपी महिला जनाबाई जाधव व सविता पगारे या दोघी ५ वर्षांच्या मुलाला बेलण्याने मारहाण करीत होत्या. ही माहिती समाजताच वीर यांनी त्यांच्या तावडीतून मुलाची सुटका केली. त्याची माहिती पोलिसांना दिली. यानुसार पोलिसांनी दोन्ही महिलांसह पीडित मुलाला पोलीस ठाण्यात आणले. त्या ठिकाणी बालकल्याण संरक्षण कक्षाच्या महिला अधिकारी ॲड. सुप्रिया इंगळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक बाजारे, कैलास पंडित यांनी पीडित मुलास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने आरोपी महिलांनी भीक मागण्यासाठी विकत आणले असल्याचे सांगितले, तसेच भीक मागण्यासाठी नकार दिल्यास त्या मारहाण करीत असल्याचेही पीडित मुलाने सांगितले. यानंतर वीर यांच्या फिर्यादीवरून दोन महिलांच्या विराेधात गुन्हा दाखल केला. या दोघींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांच्यासमोर हजर केले असता, त्यांना ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीकांत भराटे करीत आहेत.

दीड लाखात दोघांना घेतले विकतपोलिसांनी आरोपी महिलांची विचारपूस केली असता, त्यांनी ५ वर्षांच्या मुलाला ५५ हजारांत आणि जालन्यातील २ वर्षांच्या मुलाला १ लाख रुपयांमध्ये त्यांच्या आई-वडिलांकडून विकत घेतल्याची माहिती दिली. मुलांना विकत घेतल्याचा लेखी करारही १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर झाला असल्याची माहिती आरोपी महिलांनी पोलिसांना दिली आहे. पोलीस बॉण्डवरील साक्षीदारासह यात आणखी कोणी आहे का, याचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस