शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तस्करांच्या मीटिंगमध्येच पोलिसांचा छापा; आठवडाभरात नशेच्या ३ हजार बाटल्यांची विक्री उघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:33 IST

मेडिकलच्या परवान्यावर नशेचा धंदा! गुन्हे शाखेने ३ हजार बाटल्यांचा साठा जप्त करत ५ तस्करांना ठोकल्या बेड्या.

छत्रपती संभाजीनगर : गुन्हे शाखेच्या नऊ दिवसांतील पाच कारवायांत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १६ जणांना अटक झाली. मात्र, तरीही जिन्सीत मेडिकल परवाना असलेल्या व्यावसायिकासह १२ जणांची टोळी अद्यापही नशेच्या औषध विक्रीत सक्रिय होती. गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री किराडपुरा, बायजीपुरा, जिन्सीत एकाच वेळी छापे टाकत पाच तस्करांना अटक केली. तब्बल ३ हजार नशेच्या पातळ औषधांच्या बाटल्यांचा साठा जप्त केला. काही दिवसांपूर्वी आठवडाभरात ३ हजार बाटल्यांइतकाच साठा विक्री केल्याची धक्कादायक माहिती तस्करांच्या चौकशीतून समोर आली.

२४ जानेवारी रोजी गुन्हे शाखेने सर्वप्रथम शहरात पातळ औषधांचा साठा घेऊन येणाऱ्या लातूरच्या तस्करांना अटक केली. त्यात अशपाक शेख हा मुख्य तस्कर रेकॉर्डवर आला. तब्बल १६ जणांना अटक करण्यात आली. या पाच कारवायांतील गुन्ह्यांचा तपास सुरू असताना, गुन्हे शाखेला किराडपुऱ्यात मेडिकल व्यावसायिकाच्या घरात मोठा साठा असल्याची माहिती मिळाली. पाेलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून वरीष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अर्जुन कदम, अभिजित चिखलिकर यांनी पथकासह रात्री ११ वाजता किराडपुऱ्यात छापा टाकला. त्यात ओबेदुल्ला अब्दुल्ला (३२, रा. किराडपुरा) याच्या घरात तब्बल ३ हजार बाटल्यांचा साठा सापडला. अन्य ११ तस्करांच्या माध्यमातून तो या बाटल्यांची विक्री करत होता.

यांना झाली अटकओबेदुल्ला अब्दुल्ला सोबत बाटल्यांची विक्री व व्यवहार करणाऱ्या शेख सोफियान शेख नजीर (३४, रा. बायजीपुरा), अब्दुल नावीद खान अब्दुल समी खान (३१, रा. जिन्सी), शेख नावेद शेख हमीद (२५, रा. लेबर कॉलनी) व शेख अय्याज उर्फ शेरु शेख सिराज (४२, रा. किलेअर्क) यांना गुन्हे शाखेने रात्रीतून अटक केली. यांच्या अन्य सात साथिदारांचा पोलिस शोध घेत आहेत.

तीन वर्षांपूर्वी मेडिकल बंदओबेदुल्ला अब्दुल्ला याने तीन वर्षांपूर्वी शहागंजमधील मेडिकल बंद केले. मात्र, त्याच परवान्यावर तो गुजरातमधून औषधांसाठी ऑर्डर देत होता. अब्दुल नावीद त्याची बाहेरील विक्री सांभाळत होता. नाविद थेट मुख्य तस्कर शेख अशपाक शेख इसाकच्या संपर्कात होता. शेख अय्याज उर्फ शेरु शेख सिराज हा कुख्यात गुन्हेगार फैजल तेजाचा सख्खा काका आहे. तेजा सध्या कारागृहात आहे. तर शेख नावेद शेख हमीद रुग्णालयांमध्ये कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट घेतो.

बैठक सुरू असतानाच छापाशहरातील काही मुख्य तस्करांना अटक झाली, तर काही भूमिगत झाले. यात नशेच्या औषधांची कमतरता आल्याने ओबेदुल्लाने त्याचा गैरफायदा घेण्याचे ठरवले. चढ्या दराने विक्रीबाबत मंगळवारी बैठक घेतली. त्याच वेळी गुन्हे शाखेने छापा मारला. बाटल्यांवरील लेबल काढून ते विक्री करत होते. विशेष म्हणजे, तरीही आठवड्याला तीन हजार नशेच्या बाटल्यांची विक्री होत असल्याची माहिती त्यांच्या चौकशीतून समोर आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Police Raid Drug Dealers' Meeting; Thousands of Bottles Seized!

Web Summary : Police raided a drug dealers' meeting in Chhatrapati Sambhajinagar, arresting five and seizing 3,000 bottles of intoxicating liquid. The investigation revealed the gang sold a similar amount weekly, exploiting shortages after previous arrests. The main dealer used an old medical license to order drugs.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDrugsअमली पदार्थ