शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या योजना चिरंतन विकासाच्या

By admin | Updated: October 8, 2014 01:09 IST

औरंगाबाद : राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यावर चिरंतन विकास करणाऱ्या योजना तयार ठेवल्या आहेत, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

औरंगाबाद : राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यावर चिरंतन विकास करणाऱ्या योजना तयार ठेवल्या आहेत, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी सभेत बोलताना केले. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आठवी ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम असलेले टॅब्लेट देण्यात येईल. त्यामध्ये उर्दूसह सर्व भाषांनिहाय अभ्यासक्रम असेल. क्रांतिकारी घटनांचा इतिहासही त्यात असेल. ग्रामीण भागातील मुलांना नामांकित संस्थांची ड्रिगी आहे त्या भागात शिकून मिळविता येईल. इंद्रधनुष्य, शिवआरोग्य योजना तयार केल्या आहेत. शिवआरोग्य योजनेत रुग्णांना एकात्मिक उपचाराची सोय करून देण्यात येईल. पापड आणि लोणचे तयार करणे म्हणजे महिला बचत गट नव्हे. लोकल टू ग्लोबल उत्पादनांशी बचत गट बरोबरी करतील. त्यासाठी त्यांना शिवशाहीचे शासन अर्थसाहाय्य देईल. शेतीसाठी स्वतंत्र बजेट असेल. शेतकऱ्यांना विहिरीतील पाणी उपसण्यासाठी स्वयंचलित ऊर्जेचे साधन देण्यात येईल. संत विद्यापीठ स्थापन करण्याची संकल्पना ठाकरे यांनी बोलून दाखविली. भाजपाचा जावईशोध गुजरात, छत्तीसगढ या राज्यांत भाजपाची सत्ता होती. तेव्हा देशात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. असे असताना त्या दोन्ही राज्यांचा विकास झाला नाही का? मग दिल्लीत भाजपाचे सरकार असल्यामुळे राज्यात भाजपाचे सरकार आले तरच विकास होईल. हा भाजपाचा जावईशोध नाही का, असा टोला ठाकरे यांनी लगावला. शिवसेनेचे सरकार आल्यावर शहरातील विविध विकास योजना अडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सेना पक्षप्रमुख ठाकरे यांची मागील पाच वर्षांत झालेल्या सभेच्या तुलनेत आजच्या सभेला मोठी गर्दी होती. लोकसभा निवडणुकीलादेखील खा. खैरे यांना सभेसाठी गर्दी जमविता आली नव्हती. आ. प्रदीप जैस्वाल व त्यांच्या टीमने आजच्या सभेचे नियोजन केले होते. व्यासपीठावरील शिवसेनाप्रमुख आणि पक्षनिशाणीचे होर्डिंग लक्षवेधी होते.