शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर भूयारी मार्गाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांकडे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:18 IST

औरंगाबाद : एका जनहित याचिकेसंदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात शपथपत्र सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की, शिवाजीनगर भूयारी ...

औरंगाबाद : एका जनहित याचिकेसंदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात शपथपत्र सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की, शिवाजीनगर भूयारी मार्गाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांकडे प्रलंबित आहे.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि दुरुस्तीसंदर्भात अ‍ॅड. रुपेश जैस्वाल यांनी २०१२ साली दाखल केलेल्या जनहित याचिकेत नुकतीच मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. आर. व्ही. घुगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकेवर वेळोवेळी सुनावण्या झाल्या. तसेच याचिकेची व्याप्तीही वाढली आहे. अ‍ॅड. जैस्वाल यांनी २०१९ मध्ये रस्त्यासंदर्भातील सात मुद्दे मांडले होते. त्याअनुषंगाने रेल्वे, महापालिका, पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागांना प्रतिवादी करण्यात आले आहे. विभागांनी त्यांच्या कामाचा प्रगती अहवालही वेळोवेळी सादर केलेला आहे. दरम्यान, गोलवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम जुलै २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे शपथपत्र रेल्वे अधिकाऱ्याने सादर केले तर शिवाजीनगर भूयारी मार्गाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांकडे प्रलंबित असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. रेल्वेतर्फे अ‍ॅड. मनीष नावंदर यांनी तर शासनातर्फे अ‍ॅड. सिद्धार्थ यावलकर यांनी बाजू मांडली.