शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या खासदारांनी केली दुष्काळी भागाची पाहणी

By admin | Updated: August 26, 2014 01:51 IST

परभणी: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार खा.बंडू जाधव व नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांच्या पथकाने सोमवारी

परभणी: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार खा.बंडू जाधव व नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांच्या पथकाने सोमवारी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाची पाहणी केली. मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण मराठवाड्यात पक्षाच्या विविध खासदारांची नियुक्ती केली आहे. परभणी जिल्ह्यातही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील नऊही तालुके टंचाईग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केले आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची नाशिकचे खा.हेमंत गोडसे व खा. बंडू जाधव हे सोमवारपासून पाहणी करीत आहेत. सोमवारी या खासदारद्वयांनी पूर्णा, पालम, गंगाखेड तालुक्यातील गावांची पाहणी केली. त्यामध्ये पूर्णा तालुक्यातील ममदापूर, सुकी, गणपूर, कान्हेगाव, खुजडा, फुकटगाव, एकरुखा, खांबेगाव, ताडकळस, धानोरा काळे, मालेवाडी या गावांचा समावेश आहे. या पाहणीत सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिके वाळून गेल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी यावेळी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. जनावरांना पिण्याचे पाणीही मिळत नसल्याचे त्यांना सांगितले. यावेळी या खासदारद्वयांनी याबाबतचा अहवाल पक्षप्रमुखांना सादर केला जाणार असल्याचे सांगितले. सोमवारी पोळा सण असतानाही दुष्काळामुळे या सणावर विरजन पडल्याचे दिसून आले. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा केलाच नाही. अनेक गावात केवळ औपचारिकता पार पाडली, असे या खासदारद्वयांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे, नंदू पाटील अवचार, बाळासाहेब घाटोळ, बालाजी वैद्य, बंटी कदम, प्रकाश कऱ्हाळे, माणिक हजारे आदींची उपस्थिती होती.