शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात दबावाचे राजकारण शिगेला

By admin | Updated: January 20, 2015 01:29 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंवर दबाव आणून पाहिजे तसा निर्णय पदरात पाडून घ्यायचा,

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंवर दबाव आणून पाहिजे तसा निर्णय पदरात पाडून घ्यायचा, ही अपप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. चार दिवसांपूर्वीच एका संघटनेने परीक्षा नियंत्रक आणि कुलसचिवपदावरून कॅप्टन सुरेश गायकवाड यांना हटविण्यास कुलगुरूंना भाग पाडले. आज प्राध्यापकांच्या संघटनेने कुलसचिवपदावर नेमलेल्या डॉ. सिरसाट यांना हटविण्यासाठी कुलगुरूंना घेराव घातला. ‘बामुक्टा’ व ‘मुप्टा’ शिक्षक संघटनेच्या २५-३० पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी कुलगुरूंच्या दालनात जाऊन घेराव घातला. तेव्हा कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात आपण सविस्तर विचारविनिमय करू, असे सांगितले. त्यानुसार त्या सभागृहात ‘बामुक्टा’चे सचिव डॉ. सुहास मोराळे, जिल्हाध्यक्ष डॉ. विलास खंदारे, जालन्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप पाटील, बीडचे जिल्हाध्यक्ष डॉ. एम.बी. धोंडगे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. गोपाल बच्छिरे, ‘मुप्टा’चे सचिव प्रा. सुनील मगरे, डॉ. संभाजी वाघमारे, राजेंद्र जाधव आदींसह अन्य प्राध्यापकांच्या उपस्थितीत कुलगुरूंना निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर कुलगुरू हे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना ऐकून घेत असतानाच बाहेर नगरसेवक अमित भुईगळ, ‘स्वाभिमानी मुप्टा’चे डॉ. शंकर अंभोरे, डॉ. किशोर साळवे, प्रा. ईश्वर मोरे व अन्य कार्यकर्ते कुलगुरूंच्या दालनासमोर येऊन धडकले. सभागृहामध्ये ‘बामुक्टा’ व ‘मुप्टा’चे पदाधिकारी तर, बाहेर ‘स्वाभिमानी मुप्टा’चे पदाधिकारी, अशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. रात्री ९ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंचा जमाव विद्यापीठात बसून होता. दरम्यान, रात्री प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. अडचणींचा सामना करण्याची माझी भूमिका आहे. मी घाबरणारा नाही; पण लोक समजून घेत नाहीत. विद्यापीठातील संघटनांचे वाढलेले वातावरण बंद झाले पाहिजे. संघटनांच्या बाबतीत आता व्यवस्थापन परिषदेत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. तरीही मी आशावादी आहे. सुधारणा होईल, अशी मला अपेक्षा आहे.