शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाठ सोडेना

By admin | Updated: April 14, 2015 00:39 IST

जालना : जिल्ह्यात अवकाळी पाऊस अद्यापही पाठ सोडेनासा झाला आहे. सलग चौथ्या दिवशी जालना, परतूर, भोकरदन, बदनापूर, अंबड, घनसावंगी तालुक्यात काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

जालना : जिल्ह्यात अवकाळी पाऊस अद्यापही पाठ सोडेनासा झाला आहे. सलग चौथ्या दिवशी जालना, परतूर, भोकरदन, बदनापूर, अंबड, घनसावंगी तालुक्यात काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे.जालना तालुक्यातील सेवली, नेर, रामनगर, हडप, सावरगाव, दरेगाव, राममूर्ती, इंदेवाडी, जामवाडी या भागात दुपारी ४ वाजेनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. परतूर तालुक्यातील वाटूर, आंबा, आष्टी, केंधळी, श्रीष्टी, हातडी इत्यादी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव परिसरातही गारपिट झाली. गारांचा आकार हरभऱ्याएवढा होता. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. सेवली, सावरगाव भागडे, पाष्टा, सोनदेव, एरंडवडगाव, वरखेड यासह अनेक गावांमध्ये गारांचा पाऊस झाला. गारपिटीमुळे कांदा, भाजीपाला तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जनावरांना लागणाऱ्या शाळू ज्वारीचा कडबा पूर्णपणे काळा झाला आहे. सेवली परिसरात हळदीच्या पिकाचेही पावसाने नुकसान झाले आहे. भोकरदन शहरासह तालुक्यात सायंकाळी ५ नंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. राजूर, हसनाबाद, केदारखेडा, दानापूर, आन्वा, इब्राहिमपूर, लिंगेवाडी इत्यादी भागात जोरदार पाऊस झाला. चार दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या वादळासह गारपिट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, शाळू (ज्वारी), मका, कांदा, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाले असून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)