प्रेमासाठी ‘ती’ मुंबईहून आली खुलताबादला, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 05:21 IST2021-09-06T05:19:38+5:302021-09-06T05:21:07+5:30

खुलताबाद पोलिसांच्या माहितीनुसार मुंबईतील एका २० वर्षीय युवतीची फेब्रुवारीत सोशल मीडियाच्या माध्यमातून महंमद अझहर महंमद इद्रीस (रा. खुलताबाद) याच्याशी ओळख झाली.

She came to Khultabad from Mumbai for love pdc | प्रेमासाठी ‘ती’ मुंबईहून आली खुलताबादला, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेमासाठी ‘ती’ मुंबईहून आली खुलताबादला, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देखुलताबाद पोलिसांच्या माहितीनुसार मुंबईतील एका २० वर्षीय युवतीची फेब्रुवारीत सोशल मीडियाच्या माध्यमातून महंमद अझहर महंमद इद्रीस (रा. खुलताबाद) याच्याशी ओळख झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क 
खुलताबाद (जि. औरंगाबाद) : मुंबईतील युवती आणि खुलताबाद येथील युवकाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम जुळले. प्रेम प्रकरणात अंध झालेली युवती त्याच्यासाठी मुंबईहून काही दिवसांपूर्वी खुलताबादला आली. संबंधित युवक लग्न करेल, अशी तिला अपेक्षा होती. मात्र, लग्न तर दूरच उलट तिला धमकावत प्रियकराने तब्बल दीड महिना अत्याचार केल्याची घटना खुलताबादेत पुढे आली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीने संबंधित युवकाविरुद्ध अखेर पोलीस ठाणे गाठून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 

खुलताबाद पोलिसांच्या माहितीनुसार मुंबईतील एका २० वर्षीय युवतीची फेब्रुवारीत सोशल मीडियाच्या माध्यमातून महंमद अझहर महंमद इद्रीस (रा. खुलताबाद) याच्याशी ओळख झाली.  त्यातून दोघांत प्रेम फुलले. ५ महिने फोनवर बोलल्यानंतर संबंधित युवतीस महंमद अझहर याने खुलताबादला ये, आपण लग्न करू, असे सांगितले. यानंतर तिनेसुद्धा कुठलाही विचार न करता २४ जूनला घरच्यांना सांगून थेट खुलताबादला आली. महंमद अझहर याने तिला एक  खोली भाड्याने घेऊन दिली. याच खोलीत ती एकटी राहात असल्याचा गैरफायदा घेऊन बळजबरीने दीड महिना शारीरिक संबंध प्रस्थापित केले.  तिने त्यास लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने स्पष्ट शब्दांत नकार दिला.

Web Title: She came to Khultabad from Mumbai for love pdc