शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

तीक्ष्ण नजरेने 'त्या' शोधतात धुळीतून सोने; सोनाराच्या दुकानातील झारेकरी महिलांचा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 5:48 PM

सराफा बाजारातील सोनाराच्या दुकानात व बाहेरील कचरा साफ करून झारेकरी महिला घमेल्यात भरून घेतात.

ठळक मुद्देआम्ही शिकलेलो नाही. पण, खानदानी झारीवाले आहेत. मातीतून सोने शोधून काढणे सोपे काम नाही

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : ‘सोनाराचा कचरा हा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो’ ही जुनी म्हण आहे. त्याची प्रचिती सराफा बाजारात साफसफाई करणाऱ्या झारीवाल्या महिलांना नेहमी येते. येथे जवळपास शंभर लहान-मोठ्या सोन्या-चांदीच्या दुकानात त्या सहा महिला मोफत झाडू मारतात. एवढेच नव्हे, तर झाडलेला कचरा टाकून न देता त्या सोबत घेऊन जातात. त्या कचऱ्यातून शोधून काढलेले सोने विकून त्या महिला आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करत आहेत. हा त्यांचा पिढीजात धंदा आहे.

या महिलांना झारेकरी असे म्हटले जाते. या महिला सराफाच्या दुकानात झाडू मारतात. कचऱ्याची जमा झालेली माती एका एका लोखंडी घमेल्यात टाकतात. नंतर त्या मातीला पाण्याने धुतात. तेव्हा त्या महिलांच्या नजरेतून सोने जास्तवेळ मातीत लपून राहात नाही. झाऱ्यातून सोने शोधून काढतात म्हणून त्यांना झारेकरी असे म्हणतात.

उल्लेखनीय म्हणजे प्रत्येक महिला दररोज १०० ते ७०० मि.ग्रॅ.पर्यंत सोने शोधून काढतातच. ते शुद्ध सोने नसते. सोनाराच्या दुकानात घडविलेल्या किंवा वितळविलेल्या दगिन्यांतील काही अंश मातीत पडतो. ते हे १८ ते २० कॅरेटचे सोने असते. १०० मि.ग्रॅ. सोन्याचे ३५० रुपये त्यांना मिळतात. असे महिन्याकाठी १० हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत त्या प्रत्येकजणी कमवतात.

खानदानी झारीवालेआम्ही शिकलेलो नाही. पण, खानदानी झारीवाले आहेत. मातीतून सोने शोधून काढणे सोपे काम नाही. पण, अनुभवातून हे कौशल्य प्राप्त केले आहे. या कामात कधी सोने मिळते, तर कधी नाही. मात्र, दिवाळीला हमखास ६ जणींना दररोज प्रत्येकी ७०० मि.ग्रॅ. पेक्षा अधिक सोने मिळते.- भीकाबाई कांबळे, झारेकरी

झारेकरीचा प्रामाणिकपणाझारेवाले सराफा बाजारातील सोनाराचे दुकान झाडून काढतात. ही परंपरा मागील दोन पिढ्यांपासून सुरू आहे. या महिला एवढ्या प्रामाणिक आहेत की, झाडून घेताना त्यांना सापडलेले सोने दुकानमालकाला देऊन टाकतात. दुकानातील फक्त कचऱ्याची माती सोबत नेतात.- जुगलकिशोर वर्मा, सराफा व्यावसायिक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGoldसोनं